Amalner

पोलीस पाटील यांची कर्तव्य दक्ष कामगिरी.. निभावला माणुसकी धर्म

पोलीस पाटील यांची कर्तव्य दक्ष कामगिरी

खेडी व्यवहारदळे येथे अनोडखी तरुण गावातील सोसायटीच्या ओट्यावर बसलेला दिसला गावातील लोकां ची लक्षात आल्यावर ती माहिती पोलीस पाटील लखीचंद पाटील यांना कळविली पोलिस पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता त्याठिकाणी जाऊन त्या तरुणाची चौकशी केली असता सदर तरुण घरात भांडण करून रागाच्या भरात रेल्वेत बसून आला होता.

त्याची समजूत काढून त्याच्या गावाचे नाव विचारून लगेच त्यांनी आपल्या जिल्हा ग्रुपवर सदर तरुण फुपनगरी येथील असून पोलीस पाटील मो न विषयी संदेश टाकला, त्यावेळी आपल्या संगटनेचे जिल्हा सोशल मीडिया प्रमुख प्रदीप चव्हाण यांनी तेथील पो पा शिरसाळे यांनी तात्काळ तेथील पो पा मनोज चौधरी यांचा मो नं ग्रुप वर दिला व माहिती जाणून घेतली.सदर तरुणाच्या घराच्या मंडळी शी सम्पर्क करून त्याचे वडील व मामा लगेच रात्री 12 वाजता गाडी करून सदर तरुणास घरी घेऊन गेले.व त्यानी पोलीस पाटील लखीचंद पाटील यांचे आभार मानले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button