Pune

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेचे अंकिता पाटील यांना बारावी परीक्षेसंदर्भात निवेदन

महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेचे अंकिता पाटील यांना बारावी परीक्षेसंदर्भात निवेदन
दत्ता पारेकर पुणे
पुणे : कोरोना पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षेसंदर्भात अद्याप राज्याच्या शिक्षण बोर्डाने निर्णय घेतला नसल्याने बारावीच्या 16 लाख विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या किंवा येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा विचार करता ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्यास त्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेने जिल्हा परिषद सदस्या व इस्माच्या सहअध्यक्षा अंकिता हर्षवर्धन पाटील यांची भेट घेऊन त्यांना बारावी बोर्ड परीक्षा संदर्भात निवेदन दिले आहे.
यावेळी अंकिता पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बारावी परीक्षा संदर्भात राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे योग्य नसून सरकारनेही अधिक दिरंगाई न करता बारावीची परीक्षा रद्द करून अथवा ऑनलाइन परीक्षा घेऊन विद्यार्थी हितकारक निर्णय घ्यावा अशी विनंती करणार असल्याचे सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button