Amalner

जि. प .प्राथमिक शाळा शिरूड येथे दिवाळीची सुरुवात

जि. प .प्राथमिक शाळा शिरूड येथे दिवाळीची सुरुवात

प्रतिनिधी : रजनीकांत पाटील

अमळनेर : अमळनेर ता शिरूड आज आमच्या जि प.शाळेत दिवाळीची सुरुवात दात्यांतर्फे मिठाई वाटपाने झाली .
माजी विदयार्थी व शिरूड विकास मंचचे कार्यकारी सदस्य पुणेनिवासी श्री धनराज भगवान पाटील व विलास भगवान पाटील हे दोघे बंधू शाळेला सर्व विदयार्थ्यांना 5 वर्षांपासून दिवाळीला मिठाई पाठवितात. शाळेच्या विकास कामांना मदत निधी मिळावा यासाठी स्वतःच्या मुलांचा वाढदिवस निमित्ताने देणगी देतात ,शाळेच्या प्रत्येक उपक्रमास आर्थिक मदत देतात अशी आजपर्यंत एक लाखाची मदत दिली आहे.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून लिफ्ट च्या व्यवसायातून पुणे येथे दोघे बंधूनी स्वतःला स्थिरस्थावर करूनशाळेच्या व गावाच्या विधायक कामात नेहमी मदतनिधी देतात त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
आजच्या या प्रसंगी विद्यार्थ्यांना दिवाळी अभ्यास दिला व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. नंदलाल कुंभार ,उपाध्यक्ष सौ.शमीम खाटीक,सदस्य श्री ज्ञानेश्वर महाजन, पालक किरण माळी, विनोद पवार भाऊसाहेब वारुळे तसेच मुख्याध्यापक सौ रत्ना भदाणे शिक्षक श्री छोटूलाल सूर्यवंशी ,श्री अशोक पाटील श्री चंद्रकांत पाटील श्री विनोद पाटील श्रीम संगीता पाटील, श्रीम दर्शना चौधरीव इ.उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button