लासूर्णे येथे एक हजार गरजू कुटुंबांना दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अन्नधान्याचे वाटप.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लासूर्णे येथील परिसरातील १००० गरजू कुटुंबांना छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील व त्यांच्या मित्र परिवार यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप नामदार दत्रात्तय भरणे यांच्या शुभहस्ते व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात झाले.
यावेळी कार्यक्रमा प्रसंगी दत्रात्तय भरणे यांनी गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले या क्रार्यक्रमाचे प्रस्तिवीक अमोल पाटील यांनी केले अडचणीच्या काळात सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी मी व माझ्या मित्रपरिवाराने हा उपक्रम राज्यमंत्री दत्रात्तय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविला असल्याचे सांगितले.
कोरोनासारख्या संकटाच्या काळात अमोल पाटील व त्यांच्या सर्व सहकारी मित्र यांनी सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी १००० वस्तुचे वाटप गरजू कुटुंबांना केले जीवनावश्यक वस्तुचे वाटप करून अमोल पाटील यांनी माणुसकीचे अखंड नाते जपत सामाजिक बांधिलकी जोपासून समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार राज्यमंत्री दत्रात्तय भरणे यांनी काढले
या कार्यक्रमाच्या प्रसंगी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तसेच सामाजिक उपक्रमाचे मार्गदर्शक श्री हेमंत पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री प्रतापराव पाटील, अॅड तेजसिंह पाटील, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री बाळासाहेब सपकळ, वालचंदनगर पोलिस स्टेशनचे कार्यक्षम पोलिस अधिकारी श्री दिलिप पवार साहेब, डॉ योगेश पाटील, श्री सागर मिसाळ,श्री निखिल भोसले, श्री पिंटु डोंबाळे, श्री लोदाडे सर, हर्षवर्धन लोंढे सर, श्री नेताजी लोंढे, श्री पिपा लोंढे, श्री सचिन खरवडे, श्री आबा ठोंबरे, श्री संतोष लोंढे, श्री दिपक लोंढे, यांच्यासह लासुर्णे परिसरातील ग्रामस्थ उपस्थित






