तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या धनादेश चे वाटप
नूरखान
अमळनेर तहसिल कार्यालय अमळनेर येथे तहसिलदार अमळनेर यांचे दालनात तहसिलदार अमळनेर यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजना धनादेश वाटप, आरसेनिक अल्बम -30 सीएच होमियोपेथिच्या गोळया वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
कुटुंब अर्थ सहाय योजनेचा 12 लाभार्थीना गेल्या दिवसांत
संजय गांधी आणि राजीव गांधी असे एकूण 2500 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.
यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील एकुण 12 विधवा स्त्रियांना प्रत्येकी रु. 20000/- वीस हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास मा, तहसिलदार सो अमळनेर श्री मिलिंदकुमार वाघ नायब तहसिलदार संजय गांधी योजना अमळनेर श्री योगेश पवार, इंदिरा गांधी योजना अव्वल कारकून श्रीमती संगीता घोंगडे व लिपीक श्री संजय ब्राम्हणे उपस्थित होते. पती मयत झालेनंतर कुटुंबाचे छत्र हरविलेनंतर अर्थसहाय्य म्हणून खालील विधवांना सदर योजने अंतर्गत धनादेश वाटप करण्यात आले. अमळनेर येथील श्रीमती शालुबाई गोविंदा वानखेडे, भुराबाई अशोक साळुखे, साधना चंद्रकांत गिते, लताबाई अर्जून धनगर, सुरेखा नाना शेटे, प्रमिला अशोक चौधरी, जुनोने -तुळसाबाई साहेबराव महाले जानवे- मनिषा बापू पारधी, बोरगांव- शांताबाई जंगलु भिल, मायाबाई मंगा भिल पळासदळ- मंगलबाई सुक्राम भिल व पिंपळे बु. येथील आशाबाई अनिल म्हस्के अशा त्या पात्र लाभार्थी स्त्रियांना योजनेचा लाभ देण्यात आला.
संजय गांधी निराधार योजनेची बैठक दिनांक 5/5/2020 रोजी घेण्यात आली असून त्या अंतर्गत एकूण 147 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत एकुण 387 प्रकरणे,
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ,
विधवा व अपंग योजने अंतर्गत एकुण 91 प्रकरणे मंजुर करण्यात आले आहे.






