Erandol

एरंडोल कंटेन्मेट झोन मध्ये आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांची वाटप

एरंडोल कंटेन्मेट झोन मध्ये आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांची वाटप

विक्की खोकरे

एरंडोल शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, त्या पार्श्वभूमीवर कोरोना रोखण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांची रोग प्रतिकार शक्ति वाढवून यावर मात करण्यासाठी शहरात कंटेन्मेट झोन मध्ये आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांची वाटप

24/5/2020रोजी शहरात करण्यात आली. याप्रसंगी तहसीलदार सौ अर्चना खेतमाळीस,तालुका आरोग्य अधिकारी फिरोज शेख, कार्यालय अधिक्षक श्री संजय ढगाळ, मा नगरसेवक श्री योगेश महाजन ,वैभव पाटील,आशिष परदेशी आदी उपस्थित होते.

चीन मधुन जगभर पसरलेल्या कोरोना विषाणू वर आतापर्यंत कोणतेही रामबाण औषध व लस तयार झाली नाही. त्यामुळे कोरोनाने आतापर्यंत जगभरात लाखो लोकांचा बळी घेतला आहे. यात जेष्ठ नागरीक आणि कमी प्रतिकार शक्ति कमी असलेल्या व्यक्तींचा सहभाग आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय हा एकमेव उपाय सध्या तरी आहे. चांगली प्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनावर मात करता येते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या आयूष मंत्रालयाने ह्या गोळ्यांची शिफारस केली आहे.

आर्सेनिक अल्बम 30 ह्या गोळ्यांचे कोणतेही दुष्परीणाम नसल्याने लहानांपासुन ये मोठ्यांपर्यत , गरोदर महिला, उच्च रक्तदाब असलेले, मधुमेह व ईतर आजार असलेले कोणीही व्यक्ती घेऊ शकतात. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अशी माहीती पालिकेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button