Amalner

Amalner: अतिवृष्टी पंचनामा व पर्जन्यमानाची माहिती जाहीर करा..आम आदमीची तहसीलदारांना मागणी

अतिवृष्टी पंचनामा व पर्जन्यमानाची माहिती जाहीर करा..आम आदमीची तहसीलदारांना मागणी

अमळनेर- एक जून ऑक्टोबर 2021 ची पर्जन्यमान आकडेवारी व अतिवृष्टीचे पंचनाम्याची सविस्तर माहिती जाहीर करा व आम आदमी पार्टीस त्याच्या नकला द्याव्यात अशी मागणी अमळनेर आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आली आहे.
राज्यात 2021 चे अतिवृष्टीची नुकसानभरपाई देण्यात आली आहे मात्र अमळनेर तालुका या पासून वंचित राहिला असल्याने आम आदमी पार्टी आक्रमक झाली आहे!
या संदर्भात आप चे शिवाजी पाटील, डॉ रुपेश संचेती, तालुका संयोजक संतोष पाटील, दिलीप बाबुराव पाटील, नंदू जगन्नाथ पाटील, भुपेंद्र पाटील, किरण भालेराव, नितीन पाटील, किरण रतिलाल पाटील, प्रवीण पाटील, सचिन करनकाळ, आकाश पाटील, अभिमन्यू चिखलोदकर, पवन पाटील, राहुल पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते, अशी माहिती संतोष पाटील यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
शेतकरी हितासाठी आम आदमी पार्टी संवेदनशील असून सातत्याने हा विषय लावून धरला असल्याने शेतकरी बांधवांनी आप चे आभार प्रकट केले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button