उमरेड तालुक्यात संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
चांपा प्रतिनिधी अनिल पवार
सकाळी ८वा वाजता पासून असलेल्या संततधार पावसामुळे उमरेड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले .येथील महामार्गावर सह गावांना जोडणारे रस्ते, नदी , नाल्यावर पूर आल्याने काही गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर गेले आहेत .नदी नाल्यांना पूर आल्याने शाळकरी मुला-मुलीना पुराचा फटका सहन करावा लागला. शिवाय वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. पुराचे पाणी शेतात शिरल्याने उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .तालुक्यातील मटकाझरी चिमणाझरी वडद ते नागपुर मार्गावरील नदीला पूर आल्याने सकाळी ८वाजता पासून संततधार पावसामुळे नदीला पाच फूट उंच पूर आल्याने गावातील पन्नास पेक्षा जास्त नागरीक, व कर्मचारी शुक्रवारी कामावरून घरी परत येताना वडद नदीला मोठा पूर आल्याने नागपुरच्या वेगवेगळ्या कंपनीत काम करणारे कर्मचारी व भाजीपाला विक्रीसाठी नेणारे शेतकरी असे अंदाजे पन्नास पेक्षा जास्त जण सकाळ पासून अडकून पडले .
उमरेड तालुक्याच्या उत्तरेकडील भागात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली .असून वडद गावातील शेतकरी सह कर्मचारी सकाळ पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उमरेड तालुक्यात नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत . आधिच पावसामुळे व इतर नदीनाल्यांचे पाणी त्यात शिरल्याने पूरामुळे तालुक्यातील 100%टक्के विहिरी तलाव नदीनाले ओव्हर फ्लो वाहत आहेत .आसपासच्या शेतातही पाणी शिरले .शेतातले पाणी हळदगावात शिरल्याने संपूर्ण परिषर जलमय जलमय झाला .हळदगावात तिन दिवसांपासून पूरस्थिती असल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले घरात पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली .पहाटे पासून संततधार पाऊस सुरू असल्याने उमरेड तालुक्याला पार झोडपून काढले .हळदगावात पुन्हां पूरस्थितीमुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने लोकांना पाण्यातून वाट काढावी लागत असल्याचे चित्र बघावयास मिळाले . पेंढरी येथे घरात पाणी शिरल्याने तिन घर कोसळले सुदैवाने मोठी जीवितहानी टळली .
तालुक्यात काही गावात घरात पाणी शिरल्याने घरांची पडझड होण्याची भीती निर्माण झाली आहे.त्याचबरोबर अन्न धान्य कपड्यांची नासधूस झाली आहे.काही गावात मातीच्या घरांचे नुकसान मोठया प्रमाणात होण्याची शक्यता आहे .









