Amalner

शिरूड परिसरातील नागरिक जुमानत नसल्याने पत्रकार रजनीकांत पाटील यांची बातमीतून प्रशासनाकडे कार्यवाही ची मागणी

शिरूड परिसरातील नागरिक जुमानत नसल्याने पत्रकार रजनीकांत पाटील यांची बातमीतून प्रशासनाकडे कार्यवाही ची मागणी

अमळनेर

कोरोना सारखा आजाराने अमळनेर तालुक्यात थैमान घातले असताना आणि तो आजार आता शिरूड गावापासून काही अंतरावर येऊन ठेपला असून गावातील नागरिक जुमानत नसून गावात बेसावध पणे कुठल्याही प्रकारे स्वतःच्या सुरक्षिततेची खबरदारी न घेता बिनधास्त मोकाट फिरणारे, तसेच तोंडाला मास्क न लावणे, गल्लो गल्ली घोळखे करून उभे राहणे ,गावातील चावडी वर येऊन गप्पा झोडणे यात सोशल डिस्टन्स चे देखील तीन तेरा होत आहे. या बाबत चे प्रकार गावात सकाळी तसेच संध्याकाळी चालतात. अद्यापही गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्या दिलेल्या सूचनेला कोणीही जुमानत नसून कोणीही ऐकण्यास तयार नसून गावात कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याने दिसत आहे. आतापर्यंत सरपंच, पोलीस पाटील यांच्या कडून कुठलीही कार्यवाही झाली नाही या गोष्टीची दखल पोलीस प्रशासनाने तात्काळ घावी अशी मागणी ठोस प्रहार चे पत्रकार रजनीकांत पाटील यांनी बातमी द्वारे केली आहे
तसेच गावात शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात असून यावर कार्यवाही करावी अशी मागणी देखील केली आहे.या संदर्भात बातमीदार रजनीकांत पाटील यांनी केलेल्या तक्रारी नुसार आज ठोस प्रहारच्या संपादिका यांनी देखील राज्यमंत्री मा ना गुलाबराव पाटील यांच्या कडे आज पंचायत समिती त बैठक सुरू असताना हा मुद्दा मांडला होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button