देवगांव देवळी हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
यशाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांचे यश
अमळनेर प्रतिनिधी नूरखान
देवगाव देवळी एज्युकेशन सोसायटी धुळे संचलित महात्मा जोतीराव फुले हायस्कूल देवगाव देवळी तालुका अमळनेरचा दहावी मार्च 2020 चा निकाल 100 टक्के लागला असून शाळेतील 42 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रथम-विरेंद्र प्रविण पाटील 90.60,
द्वितीय-वैष्णवी धनराज माळी 85.40,
तृतीय-राजेश बळीराम पाटील 84.20
चतुर्थ-वृषभ संभाजी पाटील 84.00,
पाचवा-साहिल राजेंद्र पाटील 84.00 गुण मिळविले.
तर विशेष प्रविण्यसह उत्तीर्ण विद्यार्थी-22,प्रथम श्रेणी-17,द्वितीय श्रेणी-03, असे एकूण-42 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विलासराव पाटील, उपाध्यक्ष नवल बाबुराव पाटील ,सचिव श्रीमती मंदाकिनी शांताराम पाटील , संचालक मंडळ व शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक अरविंद सोनटक्के, ईश्वर महाजन, सुरेश महाजन, हरी माळी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






