kalamb

इंदापूर तालुक्यात कळंब मध्ये दोन भावंडाचा मृत्यू.

इंदापूर तालुक्यात कळंब मध्ये
दोन भावंडाचा मृत्यू.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे : इंदापूर तालुक्यातील कंळब येथे लहान भावाचा मृत्यू झालेला धक्का मोठ्या भावाला सहन न झाल्याने मोठ्या भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन सख्या भावांच्या मृत्यूमुळे वालचंदनगर, कळंब परीसरात शोककळा पसरली आहे.

या घटनेमध्ये यशराज नवनाथ कडाळे (वय १५) व यशवंत नवनाथ कडाळे (वय १३) या दोन सख्या भावांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार वालचंदनगर (ता.इंदापूर) मधील यशराज व यशवंत कडाळे दोघे भाऊ कळंब गावच्या हद्दीतील भोरकरवाडीमध्ये मामाच्या घरी आईसोबत राहत होते. मुलांचे वडिल नोकरीनिमित्त परदेशामध्ये आहेत.
दि.१२ रोजी सकाळी सातच्या सुमारास लहान भाऊ यशवंत कडाळे याला अचानक चक्कर आल्याने बाथरुमजवळ बेशुद्ध पडला. लहान भाऊ बेशुद्ध झाल्याने मोठा यशराज तातडीने लहान भावाजवळ आल्यानंतर तोही बेशुद्ध झाला.दोघांना वालचंदनगर मधील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला होता.

बारामतीमधील सिल्वहर ज्युबली हॉस्पिटलमध्ये दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, बारामती शहर पोलिस ठाण्यात दोन्ही भावांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दोन भावांच्या मृत्यूमुळे कळंब,वालचंदनगर परीसरावरती शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button