Amalner

विभागीय खान्देशी बोली भाषा मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन सोहळा संपन्न

विभागीय खान्देशी बोली भाषा मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन सोहळा संपन्न

अमळनेर भाषेत शुद्ध अशुद्ध असा भेद निर्माण करून बोली भाषांचा अपमान करणाऱ्याच्या डोक्यावर खापरं फोडून विभागीय खान्देशी बोली भाषा मराठी साहित्य संमेलनाचे उदघाटन सुप्रसिध्द साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आपल्या भाषणातून जाहिरपणे केले.
‘बोलीभाषा बाबत समाजाचा दृष्टिकोन काय आहे. भाषा हि भाषा असते .भाषा शुद्ध किंवा अशुद्ध नसते,जे अहिराणी भाषेला कमी लेखतात अशा लोकांना चौकात घेतले पाहिजे. जी सगळया भाषाना जवळची असते ती भाषा प्रमाण भाषा असते,कोणत्याही शिक्षित माणसाला प्रमाण भाषेचे नियम माहिती असावे, भाषा शुद्ध अशुध्द तेच्या वादाने शहरी व ग्रामिण विदयार्थ्यांनमध्ये दरी निर्माण केली. बोलीची खोली व समृद्धपण तिच्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळेच संस्कृत भाषा एक तळे झाले आहे, याकडे येणारा ओढा कमी आहे. मराठीची अवस्था अश्या बोलीभाषेसारखी करायची आहे का?बोलीभाषेतील शब्द प्रमाण भाषेत यायला लागले. जगण्यातून तयार झालेल्या म्हणी,गाणे निरक्षर लोकांनी जगतांना जे ज्ञान मिळविले तो केवळ अक्षर येत नाही म्हणूनअनाडी कसा?अक्षरात ज्ञान असते का?बोलीभाषेकडे आपण हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे मत ही त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले
यावेळी दिप प्रज्वलन करून उदघाटक डॉ राजन गवस, नामवंत ,संमेलनाध्यक्ष अशोक कौतीक कोळी, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई सदस्य व कवी रमेश पवार, कवी अशोक सोनवणे,
तहसीलदार आबा महाजन, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ,आदिंनी केले. यावेळी पुज्य सानेगुरुजी यांच्या पुतळयाला पुष्पहार मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. कार्यक्रमात मान्यवरांचा ग्रंथालयाच्या संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संमेलनाचे स्वागताध्यक्षअध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी साहित्य चळवळी त स्थानिक साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या उद्देशाने संमेलनाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. कवी रमेश पवार यांनी सांगितले की ‘अमळनेर नगरीत विभागीय साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे अनेक खान्देशी साहित्यिक , लेखक व कवींना संधी प्राप्त करून दिल्याबद्दल सानेगुरुजी वाचनालयाच्या संचालक व आयोजकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात. विभागिय खान्देश बोली साहित्यामुळे बोली भाषेचे महत्त्व वाढेल असे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य अशोक सोनवणे म्हणाले कि सानेगुरुजी यांच्या कर्मभूमीत साहित्य संमेलन होण्याचा आनंद व्यक्त केला तर साहित्य संमेलनाचा श्रोते आनंद घेण्यापासून वंचित राहतात हि खंत व्यक्त केली.
संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोळी आपल्या प्रमुख भाषणात म्हणाले की, ” बोलीभाषेत मी आतापर्यंत सतत लिहत राहिलो यामुळे मला या संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले .मनोरंजनसाठी लेखन नको, साहित्यिक चळवळीसाठी लेखन हवे,लेखकाने आपल्या मताशी ठाम असावे, लेखणी शोषित समाजासाठी चालवली गेली पाहिजे. असे आवाहन करतांना खान्देशातील तावडी भाषेला एक वेगळे महत्त्व आहे.अश्या सर्व बोलीभाषा आता समुद्ध होतांना दिसत आहे. तावडीभाषा हि माझी आई असेल तर इतर बोली माझ्या मायमावशी आहेत.अमळनेर भूमीने मला मोठा सन्मान दिला याबद्दल आभार व्यक्त केले.उदघाटन सत्राचे सूत्रसंचालन प्रा प्रकाश धर्माधिकारी यांनी केले.आभार दिलीप सोनवणे यांनी मानले.
यावेळी सभागृहात कवी सत्यजित साळवे, संदिप घोरपडे, सौ माधुरी भांडारकर, प्रा.डॉ.प्र. ज.जोशी, दर्शना पवार, प्रकाश वाघ,नगिन लोढा, सुमित धाडकर, ईश्वर महाजन , रणजित शिंदे , प्रा लीलाधर पाटील,प्रा.रमेश माने,दिपक वाल्हे, निलेश पाटील, चंद्रकांत नगावकर, दिनेश नाईक, प्रा. अशोक पवार,संजय चौधरी,विजया गायकवाड, सौ.वसुंधरा लांडगे,भीमराव जाधव,अनिल घासकडवी,पी एन भादलीकर, ऍड.रामकृष्ण उपासणी, प्रसाद जोशी, डॉ.राजेंद्र पिंगळे, हेमंत भांडारकर, उमेश काटे,रुपाली पाटील, शैलजा माहेश्वरी आदिंसह मान्यवर उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button