बोदवड येथे नाभिक समाजातर्फे कु.काजल संजय वाघचा सत्कार …
सुरेश कोळी
बोदवड येथील नाभिक समाजाचे समाजसेवक श्री संजय वाघ सर यांची मुलगी कु.काजल संजय वाघ हिचा BAMS साठी खारघर मुंबई येथे नंबर लागला.त्याबद्दल बोदवड तालुका नाभिक समाजाच्या वतीने काजलचा व तिच्या पालकांचा सत्कार व अभिनंदन करण्यात आले.अल्पसंख्याक असलेल्या नाभिक समाजातून एक मुलगी डॉक्टर होणार असल्याने समाजबांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले.विवेक वखरे व अमोल आमोदकर यांनी आपले मनोगतातून काजलला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या..यावेळी बोदवड तालुका नाभिक समाजअध्यक्ष विवेक वखरे,उपाध्यक्ष गोपाळ बोरसे,तालुका सचिव गणेश सोनोने,संस्थेचे संतोष कुंवर,राजेंद्र डापसे,अमोल आमोदकर,हरिभाऊ सुरंशे,अशोक बोरसे,अनिल कळमकर,योगेश वखरे,गोपाळ वखरे,संतोष वसाने,गोपाळ शेळके,किशोर डापसे,नितीन आमोदकर,शरद बोरणारे व बोदवड तालुक्यातील व शहरातीलअनेक नाभिक समाजबांधव उपस्थित होते…






