Pandharpur

विठ्ठल रुक्मिणी डी सी एच एस सी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ठरतेय रुग्णांसाठी वरदान निसर्गरम्य वातावरणामुळे रुग्णांचे वाढतेय मनोबल

विठ्ठल रुक्मिणी डी सी एच एस सी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर ठरतेय रुग्णांसाठी वरदान
निसर्गरम्य वातावरणामुळे रुग्णांचे वाढतेय मनोबल
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर मागील महिन्याभरात एकीकडे कोविड सेंटर फुल्ल असल्याने कोरोना रुग्णांचे हाल होत असताना भव्य निसर्गरम्य परिसर व रुग्णांसाठी आधार मिळाला आहे.पंढरपूर शहरातील सुप्रसिद्ध डॉ अमित गुंडेवार व आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली या भागातील 65 एकर या कोविड केअर सेंटरची उभारणी केली आहे.8 मे रोजी सुरू झालेल्या या सेंटरचा आजवर 115 घरी परतले असून 55 जण अद्याप उपचार घेत आहेत.
यासाठी डॉक्टर सुरज तंटक सर यांचे फार मोठे योगदान आहे रुग्णांच्या नातेवाइकांना उपचार कसा चालू आहे आणि कितपत रुग्ण प्रतिसाद देतो व रुग्णांच्या
नातेवाईकांना आधार देण्याचे काम करतात मागील पंधरवड्यात कोविड रुग्णांची संख्या प्रचंड वाढत असताना या सेंटरमुळे पंढरपूर शहरातील कोविड केअर सेंटरचा ताण कमी करण्यासाठी व रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी मोठी मदत झाली आहे.पंढरपूर डॉ पंकज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ अमित गुंडेवार सरांचे आरोग्य विभागाच्या सहकार्यामुळे उभारलेल्या या सेंटरचा शेकडो रुग्णांना फायदा होत असल्याचे या भागातील लोकांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button