Amalner

पातोंडा-सोनखेडी रस्ता बांधकाम करण्याची मागणी… तीन गावांतील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले संयुक्त निवेदन…

पातोंडा-सोनखेडी रस्ता बांधकाम करण्याची मागणी… तीन गावांतील ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले संयुक्त निवेदन…

रजनीकांत पाटील

पातोंडा-सोनखेडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून सदर रस्त्याचे बांधकाम करून शेतकऱ्यांच्या वहिवाटीची आणि पातोंडा-सोनखेडी-दापोरी या गावांच्या दळणवळणाची समस्या कायमची सोडवावी.यासाठी आज तीन गावांतील नागरिकांच्या संयुक्त सह्यांचे निवेदन तहसीलदार सो.मिलिंद कुमार वाघ,अमळनेर यांना देण्यात आले.यावेळी उपसरपंच सोपानभाऊ लोहार पातोंडा,ग्रा.पं. सदस्य सागर मोरे,सा.कार्यकर्ते घनश्याम पाटील,सरपंच विजय पाटील दापोरी,सा.कार्यकर्ते संदीप पाटील,सोनखेडी,मा.उपसरपंच मिलिंद बोरसे,सोनखेडी यांच्यासह सा.कार्यकर्ते नितीन पारधी व राकेश पाटील इत्यादी.उपस्थित होते….

पातोंडा-सोनखेडी हा रस्ता होणे खूप गरजेचे असून सदर रस्त्यामुळे पातोंडा-सोनखेडी सह दापोरी या तीन गावांतील दळणवळणाचा प्रश्न कायमचा सुटून शेतकऱ्यांना वहिवाटीची सोय उपलब्ध होईल.तेव्हा शासन-प्रशासन यांनी लवकरात लवकर लक्ष घालून रस्त्याच्या प्रश्न सोडवावा.जेणेकरून शेतकऱ्यांची समस्या कायमची सुटेल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button