हरित क्रांतीचे प्रेणेते महानायक वंसतरावजी नाईक यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा..संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीची मागणी
अमळनेर विनोद जाधव
हरित कांतीचे प्रेनेते महानायक वंसतरावजी नाईक यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी आपली शिफारस मा.मुख्यमंत्री सो.यांचा कडे करावी अशी मागणीश्री किरण लालसिंग जाधव अध्यक्ष. संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती ने आमदार अनिल पाटील यांच्या कडे केली आहे. हरित कांतीचे प्रेणेते महानायक वंसतरावजी नाईक यांनी सलग १२ वर्ष मुख्यमंत्री हे पद भुषवूण पुर्ण महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यानी फार मोठे योगदान दिले आहे.
त्यांच्या कारकिर्दीत पुर्ण महाराष्ट्र हरित कांती घडवून आणली. त्यांच्या कार्यकालामधे विविध लोक हिताचे निर्णय घेण्यात आले. त्यांच्या या समाज उपयोगाची दखल घेवून विविध सामाजिक संघटना त्याना भारतरत्न पुरस्कार मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा करित आहेत.तरी आपण महाराष्ट्रासाठी अतुलनीय योगदान देणारे हरित क्रांतीचे प्रेणेते महानायक वंसतरावजी नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी मा.मुख्यमंत्री सो.यांचा कडे शिफारस करावी अशी मागणी करण्यात आली आहे.






