Maharashtra

नागपूर व पुणे येथील हत्याकांडाची चौकशी CBI कडे देण्यात यावे,लेजन्ड व डि जी ग्रुपची मागणी

नागपूर व पुणे येथील हत्याकांडाची चौकशी CBI कडे देण्यात यावे,लेजन्ड व डि जी ग्रुपची मागणी

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

आपण संपूर्ण राज्याला कोरोनाग्रस्त होण्यापासून वाचविण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असताना राज्यात मात्र जातीयवादी लोकांचा सुळसुळाट झाला आहे .
आपणास कोरोना च्या प्रकरणात व्यस्त बघून जातीयवादी लोक आपले कुउद्दिष्ट यशस्वी करण्यात गुंतले आहेत .

व ह्याचाच परिणाम म्हणून मागील एकाच आठवड्यात महाराष्ट्र राज्यात दोन बौद्ध तरुणांना { अरविंद बन्सोड- नागपूर व विराज जगताप- पुणे) जातीयवादी शक्तींनी अमानुषपणे हत्या केली आहे .
ह्यावर कळस म्हणून की काय आपल्या पोलीस अधिकाऱयांच्या मुळे त्यातील अरविंद बन्सोड ची हत्या करणारे आरोपी आज ही मोकळे फिरत आहेत. कारण त्यांनी तेथील प्रशासन मॅनेज केले आहे .असेही यानिवेदनात म्हटले आहे.
म्हणून आम्ही आपणास विनंती करीत आहोत की आपण दोन्ही खटले CBI कडे सोपवून जलदगती न्यायालयात न्यायाची प्रक्रिया सुरु करावी .
व दोन्ही कुटुंबाना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा.

अशी मागणी लेजन्ड ग्रुपचे अध्यक्ष अमर गायकवाड यांनी एस डी ओ कळंब यांना महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या जातीवादी व खुनाच्या गुन्हेगारांना कडक शासन व्हावे.

अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button