चिमुरात पूर्णतः जनता कर्फ्यु ला
प्रतिसाद कडकडीत बंद
रस्ते पडले ओस
चिमूर ज्ञानेश्वर जुमनाके
जागतिक स्तरावर कोरोना विषाणू पसरून संकट पसरले असून त्यात राज्य जिल्हा स्तरात पसरला आहे त्यावर प्रतिबंधक उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यु ची घोषणा केली आज चिमूर सह तालुक्यातील जनतेनी जनता कर्फ्युत सहभागी होत नागरिक आपापल्या घरी राहिल्याने रस्ते ओस पडली होती दुकाने बंद होती रस्त्यावर शुकशुकाट होता
पोलीस प्रशासनने चौकात किंवा रस्त्यावर कोणीही राहू नये असे सांगत फिरू देत नव्हते त्यामुळे रस्ते ओस पडली होती .
कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाय म्हणून जनता कर्फ्यु दरम्यान सायंकाळी 5 वा नागरिकांनी टाळ ,टाळ्या व वाजवून कोरोना गो केले
जनता कर्फ्यु बंदोबस्त मध्ये ठाणेदार धुळे व त्यांच्या अधिकारी कर्मचारी जवान यांनी जबाबदारी पार पाडली तसेच जनता कर्फ्यु जबाबदारी एसडीओ संकपाळ तहसीलदार नागतीळक मुख्याधिकारी खेवले व आरोग्य अधिकारी देखरेख ठेवून कर्तव्य बजावीत आहे नागरिकांनी सुद्धा उत्तम प्रतिसाद देत जनता कर्फ्यु ला सहकार्य केले






