?️ कोरोना अपडेट..दिलासा दायक बातमी..जिल्ह्यात दुसरा रुग्ण कोरोना मुक्त..
मुंगसे येथील महिलेचा दुसरा अहवाल निगेटिव्ह.
अमळनेर
जळगांव सह अमळनेर येथे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे जळगांव जिल्ह्यातील कोरोनाचे हॉट स्पॉट म्हणून अमळनेर शहराला घोषित करण्यात आले आहे.परन्तु आज दिलासा दायक बातमी असून जिल्ह्यातील दुसरा रुग्ण कोरोना मुक्त झाला आहे.
अमळनेर येथील सर्वात पहिली कोरोना केस म्हणून मुंगसे ता अमळनेर येथील महिलेकडे सर्वांचे लक्ष होते .सदर महिलेचा पहिला कोरोना अहवाल दोन दिवसांपूर्वी निगेटिव्ह आला होता तर आज दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात आता एकही कोरोना संशयित नाही तर शहरात मात्र रेड झोन एरियातील काही रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी गेले आहेत. सध्या तरी ही एक चांगली गोष्ट असून यामुळे तालुक्यातील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.






