Ratnagiri

वादग्रस्त दोषी विजय बाईत यांना दापोलीचे “प्रभारी गटशिक्षणाधिकारी”पदभार देऊ नका,2 संघटनांचे बिडीओ व सभापती यांना 5 पानी निवेदन, आंदोलनाचा इशारा

वादग्रस्त दोषी विजय बाईत यांना दापोलीचे “प्रभारी गटशिक्षणाधिकारी”पदभार देऊ नका,2 संघटनांचे बिडीओ व सभापती यांना 5 पानी निवेदन, आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी: भ्रष्टाचारी, दोषी,बोगस अंपंगप्रमाणपञधारी,षडयंत्रकारी,वादग्रस्त श्री. विजय बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांना “प्रभारी गटशिक्षणाधिकारी ” पदभार देण्यात येऊ नये,अशी मागणी ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज फेडरेशन व बिरसा क्रांती दल या दोन संघटनांनी निवेदनाद्वारे केली आहे. दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सभापती यांना 5 पानांचे निवेदन दिनांक 31 डिसेंबर 2020 रोजी देण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, भ्रष्टाचारी, दोषी, बोगस अपंग प्रमाणपत्र धारी,षडयंत्रकारी श्री. विजय दाजी बाईत तत्कालीन प्रभारी गटशिक्षणाधिकारी खेड जिल्हा रत्नागिरी यांना खेड तथा शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांनी शिक्षक कर्मचारी व आदिवासी कर्मचारी यांच्यावर केलेल्याअन्यायकारक,अत्याचाराची,मनमानी गैरकारभाराची नियमानुसार चौकशी झालेली आहे. संदर्भ क्रमांक 1ते 9 अन्वये चौकशी अहवालानुसार श्री. विजय बाईत गंभीररित्या दोषी ठरलेले आहेत. खेड तालुक्यातील महिला शिक्षक, शिक्षक कर्मचारी व आदिवासी शिक्षक कर्मचारी यांच्या विजय बाईत यांच्या विरोधात विविध तक्रारी होत्या व आहेत. त्याचप्रमाणे शिक्षक संघटनांनीही तक्रार अर्ज दिले आहेत. जिल्हाध्यक्ष रत्नागिरी व कोकण विभाग प्रमुख आणि अध्यक्ष बिरसा क्रांती यांनीही विजय बाईत यांच्या विरोधात तक्रारी अर्ज दाखल केलेले आहेत. ” शिक्षक बदल्यांतील गडबडीचा ऑडीओ वायरल चौकशीची मागणी, विजय बाईत यांच्या अपंग प्रमाणपत्राची चौकशी, शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाईत यांच्या चौकशीचे आदेश, विजय बाईत यांना बडतर्फ करण्याची मागणी, विजय बाईत यांना निलंबित करा,खेड गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांची उचलबांगडी ञिसदस्यीय समिती भ्रष्टाचाराची चौकशी करणार, विजय बाईत चौकशी अहवालात दोषी,विजय बाईत प्रभारी गटशिक्षणाधिकारी खेड यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन इत्यादी बातम्या वृत्तपञात प्रसिद्ध होऊन शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरीचे नाव विजय बाईत यांनी खराब केलेले आहे. Zee24 tass व Tv9 वर शिक्षक बदल्यांत प्रत्येकी 22 हजार रुपये शिक्षकाकडून घेतल्याची ऑडीओ क्लीप वायरल, जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभागाचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर, विजय बाईत नावाच्या अधिकार्याने पैसे घेतल्याचा ऑडीओ संभाषण अशा टि.व्ही वरील न्यूजमुळे विजय बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांनी शिक्षण विभागाला काळीमा फासला आहे. पवित्र अशा शिक्षण विभागाला आपल्या वाईट कृत्याने विजय बाईत यांनी कलंकित केले आहे. विजय बाईत यांना माफ न करण्यासारखे लाजीरवाणे कृत्य केले आहे. या वादामुळे व चौकशीत दोषी ठरल्यामुळे विजय बाईत यांची खेड तालुक्यातून दापोली तालुक्यात बदली करण्यात आली आहे.
खेड तालुक्यातील जीवन कोकणी उच्च श्रेणी मुख्याध्यापक ,
चंदन गावीत उपशिक्षक , दिलवरसिंग तडवी उपशिक्षक बळवंत वसावे उपशिक्षक सौ.पेडामकर मॅडम उपशिक्षिका, बारकू वळवी उपशिक्षक , दिलवरसिंग वळवी उपशिक्षक, गणपत तडवी उपशिक्षक, छोटू शिंदे उपशिक्षक ,सुशीलकुमार पावरा यांना शारिरीक मानसिक ञास देणे,अपमानास्पद वागणूक देणे,पगार थांबवणे,षडयंत्र रचणे,स्वतः लिहून ठेवलेल्या पञावर व बाॅन्ड पेपरवर सह्या करवून घेणे, स्वतः अपंग नसताना अपंगाचे सर्व शासकीय फायदे घेणे.
इत्यादी विजय दाजी बाईत शिक्षण विस्तार अधिकारी दापोली यांच्या वर गंभीर आरोप आहेत. तेव्हा अशा वादग्रस्त दोषी व गंभीर आरोप असणार्या अधिकारीला पुन्हा” प्रभारी गटशिक्षणाधिकारी दापोली “पद देऊ नये.सदर दोषी अधिकार्यांला गटशिक्षणाधिकारी सारखे जबाबदारीचे पद दिल्यास पुन्हा सदर अधिकारी आपल्या वाईट स्वभावाने शिक्षक कर्मचारी यांना ञास देण्याचे काम करेल.भ्रष्टाचारासारखे काम करेल,आपल्या स्वतः वरील न्यायालयीन आरोप नाहीशे करण्यासाठी दबाव तंञाचा वापर करेल. पुन्हा शिक्षण विभागाला काळीमा फासण्याचे विजय बाईत काम करेल. शिवाय अशा दोषी अधिकारीला कठोर शिक्षा देण्याऐवजी पदभार दिल्यास पदाचा गैर वापर करून पुन्हा पुन्हा शिक्षण विभागाला कलंकित करण्याचे काम करेल.हे योग्य ठरणार नाही. म्हणून विजय बाईत ह्या वादग्रस्त दोषी शिक्षण विस्तार अधिकारीला गटशिक्षणाधिकारी पदभार देऊ नये. अन्य कोणत्याही अधिकारी कडे प्रभारी गटशिक्षणाधिकारी दापोली पदभार विचारपूर्वक देण्यात यावा.ही विनंती.अन्यथा विजय बाईत यांना दापोली प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदभार दिल्यास बिरसा क्रांती दल व अन्य कर्मचारी संघटना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल.होणारे परिणामास सर्वस्वी जबाबदार जिल्हा परिषद रत्नागिरीचे संबंधित वरिष्ठ अधिकारी असतील.अशी मागणी करत ऑल इंडिया आदिवासी एम्पलाईज रत्नागिरी व बिरसा क्रांती दल या 2 संघटनांनी आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button