?️ कटकारस्थान रचतेय खाकी विरुद्ध खाकी
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथील एक स्वच्छ प्रतिमा असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला बदनाम करण्याचा होतोय प्रयत्न. जुने फोटो टाकून हेतुपूर्वक त्रास दिला जात असून चांगली प्रतिमा मलिन करण्यासाठी पोलीस कर्मचारी विरूद्ध पोलीस कर्मचारी हा फोटो व्हायरल करत असल्याची चर्चा दबक्या आवाजात अमळनेर मध्ये सुरू आहे.या षडयंत्रात अनेक लोक सामील आहेत
जो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यात फोटो मध्ये बाहेर गावचे नामांकित डॉक्टर आहेत. ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉक डाऊन च्या काळात अमळनेर ला येतीलच कसे अशी देखील शंका उपस्थित होत आहे.
सबंधित पोलीस कर्मचारी हा लोकप्रिय व कर्तव्यदक्ष असल्याने सुडापोटी हा प्रयत्न केला जात असून व्हायरल होत असलेले फोटो हे जुने आहेत परंतु आता अशा परिस्थितीत जळगावच्या पार्श्वभूमीवर खाकितील चांगल्या माणसांना त्रास देण्याचा जो घाट घातला जात आहे त्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगितले जात आहे.
सध्या अमळनेर मध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि शहरातील अपूर्ण पोलीस बळ पाहता अमळनेर पोलिसांवर शहराच्या कायदा आणि सुव्यस्थेची खूप मोठी जबाबदारी आहे. अश्या अत्यंत शाररिक आणि मानसिक रित्या पूर्ण पणे कार्यरत असलेल्या आपल्याच पोलीस बांधवाच्या विरोधात षडयंत्र रचून इतरांचे ऐकून बदनामी केली जात आहे.
शहरात जेवढी कोरोनाची चर्चा रंगली आहे तेव्हढी च खाकी विरुद्ध खाकी ही चर्चा ही रंगली आहे. विशेष म्हणजे खाकीला खाकीच्या विरोधात उभे करणारे वेगळेच हात आहेत.याचा मास्टर माईंड जे कोणी आहेत त्यांनी व्यवस्थित पणे खाकी च्या विरोधात खाकीला उभं केलं आहे.याचे काय पडसाद उमटतील याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. कोरोनामुळे दबक्या आवाजात आणि चोरी छुपे अनेक घडामोडी पडद्याआड घडत आहेत किंवा घडविल्या जात आहेत. विशेष म्हणजे यात जे कोणी आहेत त्यांना समोरील व्यक्तींच्या नाजूक काळातच कळा दाबायची सवय आहे. आता पर्यंत ज्यांच्या ज्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्यात आले आहेत त्यांची त्यावेळची स्थिती नाजूक म्हणण्या पेक्षा आणी बाणी चीच होती.पण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि वेळेवर सर्व उत्तरे बरोबर दिली जातात याचे अनुभव घेऊनही सदर लोक त्यातून काही शिकत नाही हे विशेष..असो सध्या तरी चित्र खाकी विरुद्ध खाकी असे असले तरी लवकरच कदाचित वेगळे चित्र पहावयास मिळेल असे अमळनेर करांना वाटत आहे.






