Kolhapur

राजकारण,समाजकारणाबरोबर अध्यात्मिकतेची आवड असणारे अजब ईश्वरी मिश्रण म्हणजे रणजितसिंह पाटील दादा -प्रा. सुनिल जाधव

राजकारण,समाजकारणाबरोबर अध्यात्मिकतेची आवड असणारे अजब ईश्वरी मिश्रण म्हणजे रणजितसिंह पाटील दादा -प्रा. सुनिल जाधव

सुभाष भोसले -कोल्हापूर
तडफदार,कार्यतत्पर,क्रिडा क्षेत्राला योगदान देणारे ,जनसामान्याचे नेते,राजकीय जिवनात राजकारणाबरोबर समाजकारण जपण खूपच असाध्य कार्य आहे.यासाठी मुळातच अंगीकृत गुण असावे लागतात आणि त्यासाठी संप्रदाय व अध्यात्मीक यांची जोड असावी लागते तरच ते शक्य होते असे अजब ईश्वरी मिश्रण म्हणजे आदरणीय रणजितसिंह पाटील दादा होत अशी भावना त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रा.सुनिल जाधव यांनी व्यक्त केली.

विदेशी दौरा करून दूध व्यवसाय वाढवून गोकुळ दूध संघ भरभराटीला नेणारे व्यक्तीमत्व म्हणजे गोकुळचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक रणजितसिंह पाटील अर्थातच दादा होत.
दादांचा जन्म 13 नोव्हेबर 1957 रोजी मुरगूड मध्ये विश्वनाथराव पाटील यांच्या कुंटुबात झाला आई सुलोचनादेवी पाटील यांनी त्यांच्यावर चांगले संस्कार केले.त्यांना वडिलांचा वारसा लाभला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करताना सी.आर,जी.एस ही पदे त्यांनी मिळविली.यावेळी वडिलांनी त्यांना मार्गदर्शन केले.

अनेक संस्थाच्या माध्यमातून त्यांनी सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली.कागल तालुक्याचे नाव देशपातळीवर नेण्याचे काम त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीत केले.सहकारातील,राजकीय क्षेत्रातील मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते गोकुळ दूध संघात चाळीस वर्ष संचालक म्हणून ते कार्यरत आहेत. आपल्या लोकांच्या पाठीशी नेहमी ते हिमालयासांरखे उभे असतात.कागल तालुक्यातील युवा वर्गाला त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.ते नेहमीच मुरगूड चा विकास करण्यास अग्रेसर आहेत.त्यांच्या सोभाग्यवती मंजुषादेवी पाटील वहिनी यांनी त्यांना नेहमीच साथ दिली आहे. लालआखाडयाच्या माध्यमातून त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय खेळाडू घडविले.

दादाना विठ्ठलभक्तीची खूप आवड आहे.दरवर्षी ते विविध कार्यक्रम आयोजीत करतात समाजसेवेची त्यांना खूप आवड आहे.दादाचे चिरंजीव पद्मसिंह व विश्वजितसिंह यांनी देखील त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला आहे व उदयोग क्षेत्रात नाव कमाविले आहे.
त्यांच्या वाढदिवसानिमित दादांना हार्दिक शुभेच्छा.त्याबरोबर त्यांचे आयुष्य सुखकर होवून त्यांना दिर्घायुष्य लाभो .अशी भावना प्रा सुनिल जाधव यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अशोक खंडागळे,संतोष वंडकर,दगडू शेणवी,बंजरंग सोनुले,सखाराम डेळेकर ,असंख्य कार्यकर्ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देणेसाठी उपस्थीत होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button