Kolhapur

ग्रामपंचायतच्या निवडणुकीत शप्पथतिला उधान तर शप्पथतितून मुक्त कर अशी स्वाभिमानी आघाडीने श्री हालसिद्धनाथाकडे केली प्रार्थना

ग्रामपंचायतच्या निवडणुकीत शप्पथतिला उधान तर शप्पथतितून मुक्त कर अशी स्वाभिमानी आघाडीने
श्री हालसिद्धनाथाकडे केली प्रार्थना

तुकाराम पाटील कोल्हापूर

कोल्हापूर : राजकीय विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच कुरणी ता. कागलच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शप्पथतिला उधाण आले. आणि याच शप्पथतितून मतदाराना मुक्त कर अशी प्रार्थना श्री हालसिद्धनाथ ग्रामविकास स्वाभिमानी आघाडीने श्री हालसिद्धनाथ देवाकडे केली. गावातील एका गटाच्या उमेदवाराने त्यांच्याच गटाच्या व इतर मतदारांच्याकडून अविश्वास दाखवत भंडारा उचलून शपथ घेण्याचा प्रकार गावभर सुरू होता. याची कुण-कुण स्व. सदाशिवराव मंडलिक साहेब व स्व. विक्रमसिंह घाटगे व स्व.विश्वनाथ आणा पाटील यांच्या आशीर्वादाने व विचाराने स्थापन झालेल्या श्री हलसिद्धनाथ ग्रामविकास स्वाभिमानी आघाडीला लागताच या आघाडीच्या सर्व उमेदवारांनी व कार्यकर्त्यांनी गावातील गरीब मतदारांच्या घेतलेल्या शप्पतेतून मुक्त कर अशी सामुहिक प्रार्थना श्री हलसिद्धनाथ देवासमोर केली. सदर घडलेल्या घटनेमुळे गावातील मतदारांना पुरोगामीत्वाची व आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. व सर्व लोकांच्या मनात आनंद निर्माण होऊन याचा स्वाभिमानी आघाडीला चांगला फायदा होईल, अशी चर्चा सर्व मतदारांच्या मधून होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button