Amalner

? चौबारी येथे स्वच्छ भारत योजनेचा फज्जा…गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य..पोलीस पाटील भावना पाटील यांची प्रशासनाकडे तक्रार

चौबारी येथे स्वच्छ भारत योजनेचा फज्जा…गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य..पोलीस पाटील भावना पाटील यांची प्रशासनाकडे तक्रार

चौबारी ता अमळनेर येथील पोलीस पाटील भावना पाटील यांनी तक्रार केली आहे की मी स्वतः राहत असलेल्या गल्लीतून जिल्हामार्ग 65 हा जातो या रस्त्यावर सायंकाळी पाच वाजेपासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यत गावात राहणारे पशुपालक त्याची जनावरे बांधून निघून जातात व ज्या जागी बांधतात तेथेच विष्टसाहित घाण पडू देतात काहींनी तर रस्त्यांच्या बाजूलाच उकिरडे टाकली आहेत यासंदर्भात ग्रामसेवक व आरोग्य सेवक यांच्याकडे मी व गल्लीतील नागरिकांनी अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी केल्या आहेत.याकडे संबधित जबाबदार दुर्लक्ष करतात तरी आपल्या स्तरावरून योग्य कार्यवाही करावी.

तसेच करोना व पावसाळ्याचे दिवस असून गावात साथीच्या आजारांसह दिवसेंदिवस गावात करोना रुग्णाची वाढ होत आहे माझ्या गल्ली या दोन महिन्यात 4 रुग्ण करोनाचे आढळुन आले आहेत त्या माझ्या वडीलांवर जळगाव जिल्हा रुग्णायात आजही उपचार सुरू आहेत यामुळे माझ्या गल्लीतील व गावातील ज्या ज्या ठिकाणी घाण आहे त्याची ग्रामपंचायत मार्फत विलेवाट लावावी व आरोग्य विभागामार्फत गावात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास आरोग्य विभागास सांगावे.
गावात लहान बालकपासून ते आबालवृद्धांना या घाणीमुळे आजार होऊ शकतात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्या अगोदर उपाय योजना राबविल्या तर बरं होईल. तसेच दैनंदिन आरोग्य सेवकास गावात राहणे बंधनकारक करा.
सदर तक्रारीच्या प्रति उपविभागीय अधिकारी अमळनेर,तहसीलदार अमळनेर आमदार अनिल पाटील,विधानसभा मतदार संघ, आरोग्य विभाग पंचायत समिती अमळनेर,ग्रामीण रुग्णालयात अमळनेर ,प्राथमिक आरोग्य कैद मारवाड ,उपप्राथमिक आरोग्य केंद्र जैतमीर,ग्रामपंचायत /प्रशासक चौबारी इ ना पाठविण्यात आल्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button