Akkalkot

ग्राम सुरक्षा रक्षक दलाची स्थापना करून जमाबंदी १०० टक्के यशस्वी.!

ग्राम सुरक्षा रक्षक दलाची स्थापना करून जमाबंदी १०० टक्के यशस्वी.!

कृष्णा यादव, प्रतिनिधी अक्कलकोट

अक्कलकोट दि.26, कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात जमाबंदीचा आदेश लागु झाला आहे. ग्रामीण भागात काटेखोरपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे म्हणुन, वागदरी ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली ग्राम सुरक्षा रक्षक दलाची स्थापना करून जमाबंदी १०० टक्के यशस्वी केले आहे. त्यामुळे पोलिसावरील ताण कमी झाला आहे.त्यामुळे या स्तुत्य कार्याचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गाव कर्नाटक महाराष्ट्र व मराठवाडा यांच्या सीमेवर आहे. सध्या देशात विशेषता महाराष्ट्रात त्यातच पुणे आणि मुंबई येथील कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव जास्त आहे. या भागातील बहुसंख्य नागरिक उदारनिर्वासाठी मुंबई व पुणेला जास्त आहे. महाराष शासनाने संपूर्ण राज्यात जमाबंदीचा आदेश काढले आहे. त्यामुळ शहरी भागातील नागरिक खेड्याकडे म्हणजे गावाकडे निघाले आहेत. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकात भीतीचे वातावरण आहे. जिल्ह्या प्रशासनाने जमाबंदीचा आदेश दिल्यामुळे पोलिसावर ताण पडलाआहे. बाहेरून येणा-या नागरिकावर लक्ष ठेवणे कठिण बनला. त्यामुळे वागदरी येथील ग्रामसेविका रेखा बिराजदार, तंटामुक्त अध्यक्ष राजकुमार यादव, शिवराज पोमाजी, महादेव सोनकावडे, सुनिल सावंत, संजय आळगे यांच्या नेतृत्वाखाली ग्राम सुरक्षा दलाचे स्थापना करण्यात आली आहे.

या दलाच्या माध्यमातुन शहरातून वागदरीत येणा-या प्रत्येक नागरिकाचे प्रा आरोग्य केंद्रात तपासणी करूनच घरी सोडत आहेत. त्यामुळे नागरिकांतुन समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच जमावबंदीचे आदेशाचे काटेखोरपणे अंमलबजावणी करण्यास भाग पाडत आहेत. या मुळे पोलिसावरील ताण कमी झाला आहे. तसेच जमाबंदी १०० टक्के यशस्वी होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button