हर्षवर्धन पाटील यांचे सोलापूर विद्यापीठातील व्यखान गर्दीत संपन्न
– शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला
दत्ता पारेकर
– हर्षवर्धन पाटील यांचे अभ्यासू भाषण !
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
राज्याचे माजी सहकार मंत्री मा.हर्षवर्धन पाटीलसाहेब यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये ” ग्रामीण विकासात सहकाराचे योगदान ” या विषयावरती व्याख्यान झाले. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला- 2020 मध्ये हे व्याख्यान गर्दीत संपन्न झाले.

हर्षवर्धन पाटील यांनी या व्याख्यानामध्ये महाराष्ट्रातील सहकार चळवळीचा सविस्तरपणे आढावा घेतला व ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासातील सहकाराचे योगदान याविषयी अभ्यासपूर्ण माहिती नमूद केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस, सिनेट सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील,प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.डॉ.विकास कदम, कुलसचिव प्रा.डॉ.विकास घुटे आदी मान्यवर उपस्थित होते.






