कांग्रेसची सत्ता असलेल्या चिमूर नगर परिषदच्या सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे ४ सभापती अविरोध निवड
चिमूर तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके
चिमूर नगर परिषदवर कांग्रेसची सत्ता असून मंगळवारी विषय समितीच्या सभापती पदाच्या झालेल्या निवडणुकीत भाजपचे चारही सभापती पदी अविरोध निवड झाली आहे.
चिमूर नगरपरिषद स्थापनेनंतर निवडणुकीत भाजपा ६, कांग्रेस ५ अपक्ष ४आणि शिवसेना २असे पक्षीय जागा निवडून आल्या होत्या त्यावेळी भाजपचे व अपक्ष मिळवू भाजपची सत्ता होती अडीच वर्षानंतर अपक्ष फोडून व एक भाजप नगरसेविका फितूर करीत कांग्रेस ने नगरपरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष बसविला आहे व सत्ता त्याचे कडे आहे .
दरम्यान भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे गट नेता नगरसेवक अब्दुल कदिर शेख यांनी विधानसभा निवडणूक पूर्वी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्यावर विश्वास ठेवून भाजप मध्ये प्रवेश केला होता त्यामुळे काही महिन्यांपूर्वी विषय समिती सभापती निवडणुकीत तांत्रिक बाब पुढे आली होती आणि विषय समिती निवडणूक बारगळली होती .
पुन्हा जिल्हाधिकारी यांचे नवीन आदेशानुसार नगरपरिषद चिमूरच्या विषय समिती सभापती पदाची निवडणूक मंगळवारी पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचे उपस्थितीत पार पडली यात चिमूर नगर परिषदच्या बांधकाम सभापती पदी अब्दुल कदिर शेख ,पाणी पुरवठा सभापती पदी भारती गोडे ,अर्थ व नियोजन सभापती पदी उषा हिवरकर व महिला बाल कल्याण सभापती पदी हेमलता ननावरे यांचे अर्ज आल्याने ते अविरोध निवड झाली .
या सभापती निवडणुकीत भाजप गटनेता छाया कनचलवार माजी नगराध्यक्ष शिल्पा राचलवार नगरसेवक सतीश जाधव नगरसेवक संजय खाटीक उपस्थित होते .
तर कांग्रेस कडून नगराध्यक्ष गोपाल झाडे, उपाध्यक्ष शिंदे ,नगरसेवक उमेश हिंगे ,नगरसेवक अरुण दुधनकर, नगरसेवक तुषार काळे ,नगरसेविका कल्पना इंदुरकर, नगरसेविका जयश्री निवटे ,नगरसेवक विनोद ढाकुनकर उपस्थित होते परंतु त्यांनी सभापती पदाचे नामांकन सादर केले नाही तर शिवसेनेच्या नगरसेविका सीमा बुटके कांग्रेस नगरसेविका श्रद्धा बंडे गैरहजर होत्या निवडणूक उपविभागीय अधिकारी संकपाळ व मुख्याधिकारी मंगेश खेवले यांच्या उपस्थितीत निवडणूक पार पडली.
सध्या चिमूर नगरपरिषद कांग्रेसच्या ताब्यात असून अध्यक्ष व उपाध्यक्ष कांग्रेसचे मात्र सभापती भाजपचे अशी स्थिती चिमूर नगरपरिषद मध्ये आहे .






