भुगर्भातुन रहस्यमय धूर व जमीन गरम मुळे नागरिक भयभीत..
प्रतिनिधी-महेश हुलसूरकर
हुलसूर : शेतकरी बाबुराव रोळे यांच्या शेतात गावच्या बाजुलाच हिम्मत नगरला लागुनच बागायती शेती आहे एक एक्कर मध्ये गाजराचे लावण केली आहे दि.१३ रोजी सकाळी ८ वा.पासून बारीक धूर १० बाय १० मध्ये तीन तास धूर निघत होता व दिवस भर ती जमीन गरम लागत आहे त्यामुळे नागरिक शेतात पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत व भयभीत दिसत आहेत.
बिदर येथील भुगर्भतज्ञ शबिर यांनी फोन वरुन माहिती दिली की पाऊस कमी जास्त प्रमाणात झाल्याने काही ठिकाणी असे होतात याला वैज्ञानिक भाषेत बेसाल्टी क्रास असे म्हणतात. घाबरण्याचे काही कारण नाही असे तीन ते चार दिवस होतात जास्त दिवस झाल्याने परिसराला भेट देऊ असे बोलत होते.






