Dhule

धुळे शहर मुख्य बस स्थानक कात टाकणार बस स्थानकाचे बीओटी तत्वावर होणार नुतनीकरण -आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना यश…

धुळे शहर मुख्य बस स्थानक कात टाकणार बस स्थानकाचे बीओटी तत्वावर होणार नुतनीकरण -आमदार फारूक शाह यांच्या प्रयत्नांना यश…

असद खाटीक

धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी आज दि. ०६-१०-२०२० रोजी मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब साहेब यांची भेट घेऊन त्यांना धुळे बस स्थानकाचे बीओटी तत्वावर नुतनीकरण व बांधकाम करणे बाबत निवेदन सदर केले. राज्य परिवहन महा मंडळाच्या धुळे विभागातील धुळे मुख्य बसस्थानकाची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झालेली आहे. शहरात यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे संपुर्ण बस स्थानकात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी जमा होते व अतिवृष्टी मुळे बस स्थानकाच्या छताला देखील गळती लागलेली आहे यामुळे प्रवाश्यांना खुप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो आहे. तसेच बस स्थानकात पावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. या स्वरूपाच्या अनेक तक्रारी आमदार फारूक शाह यांना प्राप्त झाल्या होत्या. वर्षाच्या सुरुवातीस स्वत: आमदारांनी धुळे शहर मुख्य बसस्थानकाची विभाग नियंत्रक श्रीमती मनीषा सपकाळ मॅडम यांच्या समवेत पाहणी केली होती. यावेळी धुळे बस स्थानकातुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात आणि या प्रवासासाठी किमान ९०० ते १००० बसेसच्या फेऱ्या बस स्थानकातुन होत असतात अशी माहिती आमदार फारूक शाह यांना देण्यात आली तसेच या सोबतच बस स्थानकाच्या आवारात डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण बऱ्याच वर्षापासुन झालेले नाही असे देखील सांगण्यात आले.
त्याच वेळेपासुन धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी या बस स्थानकाचे बीओटी (बांधा वापरा व हस्तांतरीत करा) या तत्वावर बांधकाम केल्यास सदर बस स्थानकाच्या जागेत व्यापारी संकुलाचे नुतनीकरण झाल्यास लहान मोठ्या व्यावसायिकांचा सदर ठिकाणी असलेल्या दुकानांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळेल व नुतनीकरण केल्यामुळे बस स्थानकाचा विकास होईल असे मानुन नामदार श्री अनिल परब साहेबांकडे याबाबत पाठपुरावा सुरु केला त्याचेच फलित म्हणुन आज धुळे शहर मुख्य बस स्थानकाच्या बीओटी तत्वावर नुतनीकरण व बांधकाम करण्या संदर्भी आदेश देण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले.

*निलेश काटे*
*जनसंपर्क अधिकारी तथा स्वीय सहाय्यक*
*आमदार, धुळे शहर*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button