Amalner

? चिमूकल्या लोकेश ने वाचविला महिलेचा जीव..अमळनेर येथील गडखांब येथील घटना..सर्वत्र होतेय कौतुक….

? चिमूकल्या लोकेश ने वाचविला महिलेचा जीव..अमळनेर येथील गडखांब येथील घटना..सर्वत्र होतेय कौतुक….

अमळनेर येथील गडखांब या गावी एका महिलेचा प्राण वाचवून चिमुकल्या लोकेश ने एक वेगळाच आदर्श घालून दिला आहे. विहिरीत उडी मारून आत्महत्या करण्यासाठी जाणाऱ्या महिलेचा पदर ओढून केवळ ९ वर्षाच्या लोकेशने महिलेचे प्राण वाचविले आहेत.घरगुती कारणामुळे वाद झाल्या नंतर संतापात विहिरीत उडी मारून जीव देण्यासाठी निघालेल्या महिलेचे प्राण लोकेश ने समय सुचकता दाखवत वाचविले.

याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी की, अमळनेर येथील गडखांब ह्या छोट्या गावातील
लोकेश संजय पाटील (वय ९) व योगेश विजय पाटील (वय १३) ही दोघे मुले गावाबाहेर असलेल्या नवीन पुला कडे गेले होते.येथे जवळच एक गाव विहीर आहे.
सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक महिला पळत पळत या गाव विहिरीकडे जातांना लोकेशला दिसली . ती महिला या विहिरीच्या
कठड्यावर चढून उडी मारणार तोच लोकेश तिच्या कडे पळत गेला लोकेशने प्रसंगावधान राखत महिलेच्या पदराला धरले आणि पदर ओढला.आणि ओरडून इतरांना हाका मारल्या.
त्याचे ओरडणे ऐकून जवळच असलेल्या अरुणाबाई धावत आल्या.आणि त्यांनीत्या महिलेला धरले. व दुसऱ्या बाजूला दुसऱ्या महिलेला आवाज दिला.त्यांचा आवाज ऐकून छायाबाई मदतीला आल्या.या सर्वांनी मिळून महिलेला बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचविले. गावा बरोबर च संपूर्ण तालुक्याला घटनेची माहिती मिळताच चिमुकल्या लोकेशच्या धाडसाचे आणि समयसुचकतेचे कौतुक होत आहे.लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींनी देखील लोकेश चे कौतुक केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button