Pune

यशवंत सेनेच्या लढ्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली दखल-संजय वाघमोडे.

यशवंत सेनेच्या लढ्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतली दखल-संजय वाघमोडे.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: राधानगरी तालुक्यातील आसनगाव धनगरवाड्यावरील श्री.लखु धोंडीराम पटकारे जेष्ठ नागरिक ,वय ६५वर्ष.राजू मांगु पटकारे वय वर्ष १४ व म्हैस यांना वनकर्मचाऱ्याडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे. घटनेची खातेनिहाय चौकशी करून सदर कर्मचाऱ्यांस तात्काळ निलंबित करणेबाबत
निवेदन सविनय ईमेलद्वारे यशवंत सेनेच्या वतीने मा.मुख्यमंत्री, उध्दव ठाकरे महाराष्ट्र राज्य मा.वनमंत्री संजय राठोड महाराष्ट्र राज्य मा.पालकमंत्री, सतेज पाटील कोल्हापूर जिल्हा.
जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हा,
मा.वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक. सह्याद्री व्याग्र प्रकल्प कोल्हापूर, यांना सादर करण्यात आली होती.

मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरेसाहेब यांनी याची दखल घेऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी यासाठी मा.जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर व जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्याकडे रितसर चौकशी करण्यासाठी पाठविण्यात आले आहे.तसेच सतेज पाटील पालकमंत्री ,कोल्हापूर जिल्हा, .दत्तात्रय भरणे,वनराज्य मंत्री, संजय राठोड वनमंत्री महाराष्ट्र राज्य, विरेंद्र संजय मंडलिक, कोल्हापूर, ,आमदार प्रकाश आबीटकर राधानगरी यांच्याबरोबर झालेल्या भ्रमणध्वनी वरील चर्चेत आसनगाव पटकारे मारहाण प्रकरणात लक्ष घालून दोषी जास्तीत कडक कार्यवाही करू असे सांगितले तसेच माजी.आमदार हरीभाऊ भदे यांनी ही वनमंत्री संजय राठोड यांच्या शी केलेल्या चर्चेत राठोड साहेब यांनी कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
यशवंत सेनेच्या वतीने सर्वांचे मनापासून आभार केलेल्या आवाहनला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रतील मा.यशवंत सेना सरसेनापती माधवभाऊ गडदे,भाऊलाल तांबडे,नाशिक शिवसेना ग्रामीण जिल्हा प्रमुख, मा.विनायक काळदाते धनगर समाज नेते नाशिक मा.अरुण शिरोळे, यशवंत सेना जिल्हा प्रमुख नाशिक ,मा.ज्योती भंडारे ठाणे, यशवंत सेना महिला जिल्हा प्रमुख,भिमराव खताळ मुंबई अध्यक्ष अहिल्याबाई प्रबोधन मंच,मा दत्ता डांगे आहिल्या देवी प्रबोधन मंच,ढोस प्रवाहच्या मुख्य संपादिका प्रा जयश्री दाभाडे- सांळुखे व अनेक सामाजिक कार्यकर्ते व यशवंत सेनेचे सर्वच जिल्हा प्रमुख व यशवंत सैनिक,पत्रकार बांधव या सर्वांचे मनापासून आभार संजय वाघमोडे यांनी मानले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button