Nashik

बार्टी मार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी.

बार्टी मार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी उत्साहात साजरी

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक-:महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, यांच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी निमित्त नाशिक येथे ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित करून कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात तज्ञांकडून मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येत होते. दि. १ ऑगस्ट पासून ते दि. ३ ऑगस्ट पर्यंत नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक समतादूताने रोज एक असे प्रत्यकी तीन ऑनलाईन कार्यक्रम zoom app द्वारे या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. चांदवड तालुक्यात समतादूत विशाल पाटील यांनी १ ऑगस्ट रोजी डॉ. राजेश साळुंके यांचे व्याख्यान अध्यक्ष मा. श्री.साहेबराव वाळवंटे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. डॉ .साळुंके सरांनी अण्णाभाऊ साठे थोर समाज सुधारक या विषयावर बोलत अण्णा भाऊंचा सर्व जीवनपाटावर दृष्टीक्षेप टाकला. त्यांनी अण्णा भाऊंचा जीवनप्रवाह किती खडतर होता पण त्यातून त्यांनी कसे मार्ग काढत आयुष्य सुंदर केले हे आपण सर्वांनी समजून घेतले तर आपल्याला एक नवीन प्रेरणा नक्कीच मिळेल असे सांगितले.

दि. २ ऑगस्ट रोजी शिक्षण अधिकारी मा. श्री. निलेश पाटील सर यांनी स्पर्धा परीक्षा आणि आव्हाने या विषयावर व्याख्यान देत सांगितले कि, अण्णा भाऊंच्या काळात त्यांच्या समोर रोजच एक आव्हाहन असायचे पण त्यांनी हार न मानता लढा दिला त्याचप्रमाणे आजच्या या स्पर्धेच्या काळात विध्यार्थ्यानी प्रामाणिक पणे प्रयत्न केले तर नक्कीच त्यांच्या पुढे एक उज्ज्वल भविष्य उभे आहे. असे प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी अधीक्षक (सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई) येथील मा. श्री. तडवी सर हे अध्यक्ष स्थानी होते. त्याच प्रमाणे दि. ३ ऑगस्ट रोजी प्रा. सौ. सुशीला ठाणगे मॅडम मराठी विषय टीचर ज्यू. कॉलेज कोपरगाव यांच्या अध्यक्षतेखाली मा. श्री. शरद सैंदाने सर पी.एस.आय. अधिकारी यांनी विध्यार्थ्यांना बार्टीच्या वतीने चालू असेल्या एम.पी.एस.सी. परीक्षेच्या क्लासच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. स्वतः मराठी शाळेत शिकून सुद्धा आज पी.एस.आय. अधिकारी असा प्रवास त्यांनी कसा केला हे सांगितले त्याच प्रमाणे अभ्यास करताना कश्या प्रकारे करावा काय ध्येय समोर ठेवावे म्हणजे आपण आपले काम योग्य रीतीने पूर्ण करत असतो. त्याच प्रमाणे अध्यक्ष सौ. ठाणगे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात देखील सर्वांसाठी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी दोघांनी अण्णा भाऊ साठे यांचा आणि इतर समाज सुधारकांचा आदर्श ठेऊन त्यांच्या कडून प्रेरणा घ्यायला हवी असे सर्वाना सांगितले.

या सर्व ऑनलाईन कार्यक्रमास विविध विभागातील लोकांनी आपला सहभाग नोंदविला यात बार्टीच्या पुणे यथील वरिष्ठ अधिकारी श्री. दिलावर सय्यद , श्रीमती. कीर्ती शेलार त्याच प्रमाणे प्रकल्प अधिकारी नाशिक श्रीमती् प्रतिज्ञा दाभाडे , यांच्या समवेत पंचायत समिती चांदवड येथील बी.डी.ओ. श्री. ज्ञानेश्वर सपकाळे, आत्मा मलिक हाय स्कूलचे श्री. कांबळे सर, श्री ठाणगे सर आणि तळ्याचा पाडा, दिंडोरी येथील ग्रामसेवक अनंत जेत्ते सर, इत्यादी अधिका-यांसोबत मोठ्या प्रमाणात विध्यार्थी वर्ग आणि इतर विविध क्षेत्रातील लोकांनी सहभाग नोंदविला. आज पर्यंत सर्व जनतेने बार्टीच्या समतादूतांना खूप साथ दिली आहे त्याचप्रमाणे आत्ता या करोनाच्या कठीण काळात देखील सर्व लोक खंबीर पणे आमच्या मागे उभे आहेत हे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीच्या निमित्ताने दिसून आले. महाराष्ट्रभर घेण्यात येणा-या ऑनलाईन व्याख्यानमालेला मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून सर्वांनी आमच्या कामाची पावती आम्हाला दिली आहे. सर्व स्तरावरून या बार्टीच्या ऑनलाईन उपक्रमाचे स्वागत होत आहे .

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री मा. धनंजय मुंडे बार्टीचे महासंचालक श्री. कैलास कणसे मुख्य प्रकल्प संचालिका श्रीमती प्रज्ञा वाघमारे आणि प्रकल्प अधिकारी श्रीमती प्रतिज्ञा दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्यातील समतादूत हे काम यशस्वी रित्या पूर्ण करत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button