Paranda

श्रीसंत गजानन महाराज यांच्या प्रगटदिना निमित्त धार्मिक कार्यक्रम साजरा

श्रीसंत गजानन महाराज यांच्या प्रगटदिना निमित्त धार्मिक कार्यक्रम साजरा

परंडा प्रतिनिधी सुरेश बागडे दि.२४

संतकृपा ही जीवनातील सर्वात मोठी कृपा असते.थोर संत हे कल्पतरुप्रमाणे असतात.मनुष्य जीवनाला योग्य दिशा देऊन त्याला उत्तम दशेला प्राप्त करुन देण्यासाठी संतानी महान कार्य केले आहे.मागील दोन वर्ष कोरोना संकटाने सर्वांनाच कठिण संघर्षाचा सामना करावा लागला.धार्मिक कार्यावरही बंधने होती. आता परिस्थिती पुर्वपदावर येत आहे.प्रगटदिन सोहळा साजरा करुन संतानी दिलेली शिकवण सर्वानी आपल्या आचरणात आणावी असे मत हभप धर्मराज दादा महाराज सामनगांवकर यांनी व्यक्त केले.
तब्बल दोन वर्षानंतर कोरोना संकटामुळे धार्मिक कार्यक्रम होवु शकले नाहीत.शहरात विविध ठिकाणी श्रीसंत गजानन महाराज यांच्या प्रगटदिना निमित्त बुधवार( ता.२३) रोजी धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.शहरातील महाराष्ट्र चँपियन पै.आप्पा काशीद यांच्या निवासस्थानी तब्बल दोन वर्षानंतर यंदा गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हभप धर्मराजदादा सामनगावकर, शिवसेना मा.आमदार ज्ञानेश्वर पाटील,नगराध्यक्ष जाकीर सौदागर, जि.प.चे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे,माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल,कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक विकास कुलकर्णी,पै.नवनाथ जगताप, देवानंद टकले,काकासाहेब साळुंखे,डाॕ.देवदत्त कुलकर्णी ,पोलीस उपनिरिक्षक राजकुमार ससाणे,जेष्ठ पञकार सुशीलकुमार शुक्ला,अॕड नागनाथ सुर्यवंशी,बाशाभाई शहाबर्फीवाले,संजय कोळगे,नगरसेवक संजय घाडगे,नगरसेवक मकरंद जोशी,गणेश राशनकर,तालुका पञकार संघाचे अध्यक्ष सुरेश घाडगे, सरपंच रावसाहेब खरसडे,कृष्णा चैतन्य,डाॕ.नितीन मोरे ,शब्बीरखाँ पठाण,समीर पठाण,बाळासाहेब पाटील,शशीकांत जाधव,संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष मनोज कोळगे,नाभिक संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष नागेश काशीद,आदिसह शहरातील राजकीय,सामाजीक,शैक्षणिक क्षेञातील नागरीक उपस्थित होते.यावेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.तसेच शहरातील कुर्डुवाडी मार्गावर,असलेल्या दयाशंकर तिवारी यांनी स्वखर्चातुन शेतात बांधलेल्या गजानन महाराज मंदिरात गजानन महाराज यांच्या प्रगटदिना निमित्त पहाटे श्रीस अभिषेक करण्यात आला.दुपारी बारा वाजता ,श्री वर गुलाल पुष्प उधळण्यात आले.यावेळी,नागरीक, महिला भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.शहारातील मंगळवार पेठेत निवृत्त क्रिडाशिक्षक शिवाजी कदम यांच्या निवासस्थानी गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविक भक्तांनी श्रीचे दर्शन घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button