पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करणारा असंविधानिक शासन निर्णय रद्द करा – डॉ.हिरा पावरा..
राहुल साळुंके धुळे
धुळे : या मागणीसाठी आज दि.२० रोजी महामहिम राज्यपाल, राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव यांना जय आदिवासी युवा शक्ती (जयस) महाराष्ट्रने निवेदन पाठविले आहे.
या निवेदनात विधी व न्याय विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागातील काही अधिका-यांनी सरकारची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप जयस ने केला असून
सरकारकडे खालीलप्रमाणे मागण्या केलेल्या आहेत.
i) आरक्षणविरोधी अमागासवर्गीय असलेलेले अजित दादा पवार यांनी मागासवर्गीयांचे न्याय हक्क डावलणारा निर्णय घेतल्यामुळे त्यांना तात्काळ मंत्री गट समितीच्या अध्यक्षपदावरुन दूर करावे व अध्यक्षपदी मागासवर्गीय मंत्र्याची नियुक्ती करावी.
ii) महाराष्ट्र शासनाचा दि. ७ मे.२०२१ रोजीचा शासन निर्णय असंविधानिक ,बेकायदेशीर असल्याने व मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन करणारा असल्याने सदर शासन निर्णय तात्काळ रद्द करावा.
!!!) मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित विशेष अनुमती याचिका क्र.28306/217मधील अंतिम निर्णयाचे अधिन राहुन मागासवर्गीयांची पदोन्नतीच्या कोट्यातील 33%रिक्त पदे बिंदूनामावलीनुसार तात्काळ भरण्याचे आदेश जारी करावे
iii)मा.मुख्य सचिव यांनी दि.21/9/2017
तसेच दि.22/3/2021 च्या शासन निर्णयाचे पालन न केल्यामुळे त्यांचेवर आरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी.
iv)पदोन्नतीमधील आरक्षणाबाबत निर्णय घेण-या समितीच्या अध्यक्षपदी मा.मुख्य सचिव यांना वगळून मागासवर्गीय प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करावी.
v) विधी व न्याय विभाग आणि सामान्य प्रशासन विभागातील काही आरक्षण विरोधी अधिकारी/कर्मचारी यांनी शासनाची व सरकारची दिशाभूल केल्याबद्दल संबंधितांवर आरक्षणकायद्याअंतर्गत कारवाई करुन तात्काळ त्यांची इतरत्र बदली करावी.
vi)सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदी आणि सामान्य प्रशासन 16(ब)विभागाचे प्रमुखपदावर सर्व मागासवर्गीयच अधिकारी, कर्मचारी यांचीच नियुक्ती करावी.
vii) मागासवर्गीयांच्या पदोन्नतीबाबत मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधी, दिशाभूल करणारा अभिप्राय देणारे मा.अँडव्होकेट जनरल यांनी जातीयवादी भूमिका घेऊन मागासवर्गीयावर अन्याय केलेला आहे.त्यामुळे त्यांना या पदावरुन निष्काषित करण्याबतची योग्य कारवाई करावी.
अशी मागणी जयस महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हिरा पावरा ह्यांनी मेल द्वारे निवेदन पाठवून केली आहे.






