Solapur

राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट द्या -पत्रकार सुरक्षा समितीचे मुख्यमंत्री यांना साकडे

राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट द्या -पत्रकार सुरक्षा समितीचे मुख्यमंत्री यांना साकडे

राजेश सोनूने

सोलापूर /महाराष्ट्र मधील महामार्गावर केंद्र सरकार व राज्य सरकार च्या मंत्रिमंडळ मधील सर्व मंत्री, सचिवालयातील सचिव, सनदी अधिकारी, न्यायाधीश, सुरक्षा मंत्रालय मधील वाहने ऍम्ब्युलन्स, पोलीस अधिकारी, खासदार, आमदार यांच्या वाहनाला महामार्ग वरील टोल नाक्यावर टोल अकाराला जात नाही त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना देखील टोल मधून सूट देण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष म्हेत्रे यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे निवेदनद्वारे करण्यात येऊन सोलापूर चे अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

राज्यातील पत्रकारांना टोल मधून सूट द्या -पत्रकार सुरक्षा समितीचे मुख्यमंत्री यांना साकडेया निवेदनात राज्याचे मुख्यमंत्री व अनेक मंत्री यांच्या सभेची उदघाटनेची , विकास कामाची, तसेच इतर राजकीय पक्षाचे मोर्चे, आंदोलने, उपोषणे,सभा वेगवेगळ्या जिल्ह्यात होत असून त्याचे वृत्तसंकलन करण्यासाठी पत्रकारांना आपल्या वाहनातून वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागते त्यामुळे पत्रकारांना महामार्गवर टोल भरावा लागत आहे तरी मुख्यमंत्री यांनी महामार्ग वरील टोल नाक्यावरील टोल मधून पत्रकारांना वगळण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे सदरचे निवेदन सोलापूर चे अप्पर जिल्हाअधिकारी यांना देण्यात आले आहे.

*पत्रकारांच्या भावना निश्चित मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवल्या जातील असे ठोस आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी यांनी पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळ ला दिले आहे*

यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार जिल्हा कार्याध्यक्ष गोविंद शेंडगे, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भगवान कदम, शहर संघटक डॉ राजेंद्र शहा, सचिव अरुण सिडगिड्डी, उपाध्यक्ष प्रभाकर एडके संपर्क प्रमुख वैजिनाथ बिराजदार, शिवलिंग म्हेत्रे, आयुब शेख, कलीम शेख, अल्ताफ शेख, अक्की बबलाद, प्रदीप पेंदापल्लीवार दत्तात्रय गणपा इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button