उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रासाठी आंनददायी बातमी कोरोना चे औषध आले महाराष्ट्रात
प्रतिनिधी-सलमान मुल्ला
कोरोनावरील फेबीफ्लू औषध हे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहे. फेबिफ्लूच्या 200 पावरच्या गोळ्या होलसेल मेडिकलमध्ये उपलब्ध झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ग्लेनमार्क कंपनीने फॅबी फ्लू या औषधाची निर्मिती केली आहे.
औरंगाबादमध्ये 34 गोळ्यांचं एक पॉकेट साडेतीन हजार रुपयात उपलब्ध झाले आहे.
डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन असल्यावर फेबिफ्लू गोळ्या मिळणार आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी हे औषध तयार केले आहे. औषध उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षणांवर औषध तयार केलं आहे. विशेष म्हणजे या औषधाला भारतीय औषध महानियंत्रक यांनीही परवानगी दिली आहे.
“फेबीफ्लू या प्रभावी औषधाच्या उपचारामुळे हा कोरोनाचा तणाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.






