Pandharpur

पंढरपुर व मंगळवेढा नगरपरिषदेने व पंढरपुर मंगळवेढा शहर विकास अघाडीच्या अध्यक्ष व नुतन आमदार यांनी जनतेची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेऊन संत दामाजीपंत यांची भुमीका बजावावी

पंढरपुर व मंगळवेढा नगरपरिषदेने व पंढरपुर मंगळवेढा शहर विकास अघाडीच्या अध्यक्ष व नुतन आमदार यांनी जनतेची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेऊन संत दामाजीपंत यांची भुमीका बजावावी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : या कोव्हीड 19 च्या टाळे बंदी मध्ये नागरिकांची लुट करण्यासाठी अनेक लोक अतोनात प्रयत्न करत आहेत.कुठेच जणता सुखी नाही.या काळात पंढरपूर नगरपालीकेने नागरिकांची घरपटी माफ केलीच पाहिजे.ही नैतीकता आहे.नगर पालीकेचे सर्व रेकाॅर्ड तपासले असता नगरपालिकेच्या निधीचा गैर वापर केल्याचे दिसुन येते,नगरपालीकेच्या प्रशासनाने व नेते मंडळीनी बेकायदेशीर कृत्य काही ठेकेदार व नगरसेवक यांच्या स्वर्थासाठी केले असल्याचे दिसुन येते.आणि CEO साहेब हे नागरिकांची घरपटी पाणीपटी माफ करा म्हणंटल्यावर शासनाला प्रस्ताव पाठवावा लागेल असे बोलतात.मग मला प्रश्न पडला की यांनी हा सर्व बेकायदेशीर बाजार मांडला आहे,त्यासाठी वरिष्ठ कार्यालयाची परवाणगी का घेतली नाही?यामध्ये कोणते जनहीत होते?घरपटी व पाणी पट्टी माफ करणे हे जणतेच्या हिताचेच आहे,मग हे काम प्राधान्याने नगरपालिकेने केले पाहीजे,पंढरपूर मंगळवेढा शहर विकास आघाडीची नगरपालिकेवरती एक हाती सत्ता आहे,मग जनहीताचे निर्णय त्वरीत घ्यायला हावेत,नेते मंडळींनी कोणी सुचवायच्या अगोदरच जनतेचा टॅक्स माफ करण्याचा निर्णय घेऊन शासनाला प्रस्ताव पाठवुन टॅक्स माफीची घोषणा करायला पाहीजे होती,नेते मंडळी व ठेकेदार यांची हिताचे कामे करण्यासाठी राज्य सरकारची परवाणगी घेण्याची गरज नेते मंडळी व नगरसेवक नगराध्यक्ष यांना वाटली नाही.मग ते ठेकेदाराला कामा पेक्षा जास्तीचे पेमेंट आदा करण्याचे असो,वा ठेकेदाराला सवलती देण्याचे असो,सातारच्या छत्रपती उदयनराजे भोसले यांनी महानगरपालीकेच्या टॅक्स माफीची घोषणा केली व प्रस्ताव नगरविकासला पाठवला,पंढरपुर नगरपालीका पाठवीला का ?मग पंढरपुर नगरपालिका टॅक्स माफीची घोषणा कधी करणार आणि जनतेचे हित कधी करणार?नगरपालिकेच्या नेते मंडळीनी जणतेचा टॅक्स माफ केला नाही तर जनता येऊ घातलेल्या नगरपालीका निवडनुकीत धडा शिकवेलच याची भिती सर्वच नेते मंडळी यांना असावी.योग्य वेळ अचुक निर्णय असावा. आम्ही आम आदमी पार्टी च्यावतीने दि 21/6/2021 रोजी घरपटी व पाणीपट्टी टॅक्स माफीसाठी आंदोलनं करणार आहोत.तरी सर्व शहर जनता जणार्दनांनी आम्हाला समर्थन देण्यासाठी आमच्या वॅटसऑप नंबरवरती (9545286999) सपोर्ट (आपली मागणी रास्त आहे असा मेसेज करावा)करावा व पाठींबा द्यावा ही विनंती. *श्री नागेश पवार सचिव आम आदमी पार्टी पंढरपुर मंगळवेढा**

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button