उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे अर्धशतक,अकरा प्रलंबित अहवाल पैकी सात पॉझिटिव्ह,
प्रतिनिधी:-सलमान मुल्ला
जिल्हा सामान्य रुग्णालय मार्फत दिनांक 25 म रोजी लातूर येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या अकरा अहवाला मधील प्रलंबित असलेल्या अहवालांमधून सात व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन व्यक्तीचे अहवाल अनिर्णीत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.तर जिल्ह्यातील रुग्ण संख्या पन्नास झाली आहे..
पॉझिटिव्ह आलेल्या सात व्यक्ती पैकी दोघे जण हे जेवळी येथील पूर्वीच्या कोरोना बधितांच्या संपर्कातील तर तीन व्यक्ती कारला येथील असून ते मुंबई येथून प्रवास करून आलेला आहे. तर आणखीनेज धुता येथील आणि केसरजवळगा येथील रुग्ण असून यापूर्वीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेला आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर गलांडे यांनी कळविले आहे.






