Pandharpur

पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ शितल के शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाच्या विविध विभागांना मंजूरी..

पंढरपूर येथील सुप्रसिद्ध बाल रोग तज्ञ डॉ शितल के शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत शासनाच्या विविध विभागांना मंजूरी..

प्रतिनिधी
रफीक आत्तार

पंढरपूर येथील सुप्रसिद्ध
बालरोगतज्ञ डॉ.शितल शहा यांच्या नवजीवन चिल्ड्रन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत नवीन १० विभागांना शासनाची मंजूरी मिळाली असून यात एकूण ८० बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.तसेच अत्याधुनिक कॅथलॅब मशीनचा समावेश आहे. योजनेअंतर्गत कार्डिओलॉजी (हृदयरोगशास्त्र ),हिमॅटोलॉजी (रक्ताशीसंबंधित आजारांचे शास्त्र,मेडिकल ओंकॉलॉजी (वैद्यकीय कर्करोगशास्त्र ),ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी,(मौखिक आरोग्य,ओठ व टाळू यांच्या विकारांसंबंधी शस्त्रक्रिया),पेडियाट्रिक मेडिकल मॅनेजमेंट (बालवैद्यकीय व्यवस्थापन), एंडोक्राईनोलॉजी (अंतस्त्रावी शास्त्र), इन्वेस्टीगेशन्स(तपासण्या),न्यूरोलॉजी (मेंदूविकार),पेडियाट्रिक सर्जरी (बालकांच्या शस्त्रक्रिया), फिजिओथेरपी इत्यादी सर्व वैद्यकीय सेवा आणि शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत पिवळ्या आणि केशरी कार्डधारक रुग्णांना पुर्णपणे मोफत दिली जाणार आहे. गेली ४० वर्ष डॉ.शितल शहा यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली हॉस्पिटलची वैद्यकीय सेवा अखंडपणे चालू असून यात सर्व विभागातील तज्ञ डॉक्टर,अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब, नवजात बालकांसाठी अत्याधुनिक एनआयसीयू विभाग, पीआयसीयू विभाग,जनरल वॉर्ड, मदर रूम,स्पेशल रूम यांचा समावेश आहे.आजतागायत हॉस्पिटलमध्ये शेकडो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आलेले आहेत. कोरोना सारख्या जागतिक महामारीतदेखील सामाजिक बांधिलकी ठेवत डॉ. शितल शहा यांनी हॉस्पिटलची सेवा अविरतपणे चालू ठेवली असून लॉकडाउनच्या काळात रुग्णाच्या नातेवाईकांसाठीदेखील मोफत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णांनी हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवांचा लाभ घ्यावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button