sawada

सावदा येथे घरकुल योजनेच्या लाभार्थीना,शेवटच्या हप्ता मिळेना ! मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.

सावदा येथे घरकुल योजनेच्या लाभार्थीना,शेवटच्या हप्ता मिळेना ! मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.

युसुफ शाह सावदा

सावदा : येथील शहरात
घरकुल बांधणे साठी नागरिकांना अनुदान देणार्‍या योजने अतर्गत असंख्य नागरिकांना अद्याप थकीत रक्कम मिळाली नाही. लाभार्थी नागरिकांना ती रक्कम त्वरित मिळावी अन्यथा सदर घरकुल विकण्याची परवानगी मिळावी. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे कडे केली आहे.
लाभार्थीनी निवेदनात म्हटले आहे की, सावदा शहरातील नागरिकांना घरकुल बाधण्यास मदत व्हावी म्हणून घरकुल योजने अंतर्गत अर्थ साहाय्य मजूर करण्यात आल्याने, अनेक गोरगरीब नागरिक यांनी अर्ज केले. यात ज्यांना घरकुल मंजूर झाले त्यांनी उधार उसनावार घेऊन घरकुल बाधणी सुरु केली व त्यासाठी ते भाड्याचे घर घेऊन राहू लागले. मात्र सदर घरकुलाचे काम कोठे पूर्णत्वास तर कोढे थोडे – थोडे बाकी असून, उर्वरित रक्कम लागत आहे. मात्र आता पैसे नसल्याने ते बाधकाम ठप्प पडले आहे,
नगरपालिकाकडे असलेली घरकुल ची प्रत्येकी सुमारे ९०००० हजाराची रक्कम अद्याप त्यांना भेटली नसून यामुळे सदर नागरिक आर्थिक संकटात सापडले आहे. घर बाधण्यास पैसे नाही, दुसरीकडे घर भाडे वाढत आहे. तर पालिके कडील थकीत रक्कम पैसे मिळत नसल्याने सदर नागरिक अडचणीत सापडले असून, या नागरिकांनी दि २७ रोजी नगरपालिकेत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून सदर थकीत रक्कम लवकरात लवकर द्यावी अन्यथा आम्हास सदर घरकुल विकण्यास परवानगी द्यावी अशी मागणी एका निवेदना व्दारे केली आहे. यावर अकबर गनी मन्यार, चुडामण वाघुळदे, विकास भोरटक्के, किशोर वारके, विकास, विकास बावणे, राजेंद्र राणे, सुलतान खान सिराज खान, यांचे सह असंख्य लाभार्थीच्या स्वाक्ष-या असून, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्य मंत्री छगन भुजबळ,मुंबई, प्रांताधिकारी फैजपुर, जिल्हाधिकारी जळगाव यांचेसह तहसीलदार रावेर. यांचे कडे निवेदन पाठवले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button