Kolhapur

खोपोलीतील रक्तदान शिबिरास नागरिकांचा ऊदंङ प्रतिसाद … शासनाच्या नियमांचे पालन करुन शिबिराचे आयोजन….

खोपोलीतील रक्तदान शिबिरास नागरिकांचा ऊदंङ प्रतिसाद …

शासनाच्या नियमांचे पालन करुन शिबिराचे आयोजन….

कोल्हापूरः आनिल पाटील

संपूर्ण देशात कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे कोरोणाग्रस्तांची संख्येत झपाट्याने वाढल्यामुळे देशात रक्तासाठ्याची कमतरता भासत आहे. रक्तसाठा करण्यासाठी राज्य सरकार व केंद्रसरकारद्वारे देशातील नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले जात असून या आवाहनाला साद देत रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी संचारबदीमधील शासनाचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन खोपोली परळी जांभुळपाडा लोहाना समाज , श्री. विमलनाथ जैन संघ खोपोली, बाबू मामा जाधव सामाजिक प्रतिष्ठान खोपोली,लायन्स क्लब आँफ खोपोली, सहजसेवा फाउंडेशन खोपोली, पाऊलवाट मैत्रीची खोपोली यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11 ते 03 .00 या वेळेत लोहाना महाजन हाँल खोपोली येथे समर्पण ब्लड बँक सँनिटाईज मोबाईल व्हँनद्वारे अत्यंत सुनियोजीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.देशात कोरोणा सारख्या भयंकर अशा जिवघेण्या साथीच्या आजाराची सर्वत्र भितीचे वातावरण असतानाही खोपोली शहरतील विविध भागातील नागरिकांनी कोरोणाला भिक न घालता सामाजिक बांधीलकी जपत निर्भिडपणे रक्तदान करत रक्तदान शिबिराला प्रंचंड प्रतिसाद देत एकून 90 रक्तदात्यांनी रक्तदान करुन देशसेवा केली.यावेळी खोपोली पोलिसांनीही नियोजनबद्ध सहकार्य केले. समर्पण ब्लड स्टोरेज खोपोली यांनी या शिबिरासठी विशेष सहकार्य लाभले .या शिबिरास मनापासून सहकार्य करणार्यांचे तसेच रक्तदात्यांंचे आयोजकांच्या वतीने आभार मानले. यावेळी खोपोली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हध्यक्ष श्री दत्ताजीराव मसुरकर , राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खोपोली शहर युवाध्यक्ष श्री. अतुलशेठ पाटील व शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थितीत होते. .शिबिराचे आयोजन करणार्यांचे सर्वत्र कोतुक होत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button