Solapur

जयविजय प्राथमिक शिक्षक संघाचे पहिले जिल्हास्तरीय अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न

जयविजय प्राथमिक शिक्षक संघाचे पहिले जिल्हास्तरीय अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न

जयविजय प्राथमिक शिक्षक संघाचे पाहिले जिल्हास्तरीय अधिवेशनाचे आयोजन अकलूज येथे मा. श्री. सुभाषराव मिसाळ यांच्या नियोजनाखाली मोठ्या उत्साहात अकलूज येथे पार पडले.जयविजय प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनाचे औचित्य साधून जयविजय प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन, जिल्हास्तरीय समूह नृत्य स्पर्धा, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय रत्नाई आदर्श शाळा पुरस्कार आणि शिक्षक रत्न पुरस्काराचे आयोजन केले होते.

समूह नृत्य स्पर्धेचे उद्घाटन मा.श्री.मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते झाले. मा. श्री.मदनसिंह मोहिते पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना जिल्ह्याचा विकास कसा झाला, तसेच जयविजय प्राथमिक पतसंस्था आणि जयविजय शिक्षक संघ यांच्या कार्याचा आढावा घेऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

अधिवेशनास महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.अनिरुद्ध कांबळे, जिल्हा परिषद सदस्या मा.कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील, मंगलताई वाघमोडे ,सुनंदा फुले माळशिरस तालुक्याच्या गट विकास अधिकारी मा.सौ.स्मिता पाटील, माळशिरस पंचायत समिती सभापती मा.सौ.शोभाताई साठे, केम ग्रामपंचायतीचे सरपंच मा.श्री.अजितदादा तळेकर तसेच जिल्ह्यातील शिक्षक बांधव आणि पत्रकार बंधु उपस्थित होते.
जयविजय प्राथमिक सहकारी पतसंस्थेच्या इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री मा.श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते झाले. प्रास्ताविकात जयविजय प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री.सुभाषराव मिसाळ यांनी जयविजय शिक्षक संघाच्या माध्यमातून शिक्षकांचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये मेडिकल बिले आणि त्यासाठी शिक्षकांना सोसावा लागणारा मानसिक त्रास , विज्ञान विषय प्रमोशन, मुख्यध्यापक भरती इत्यादी अनेक प्रश्न मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितित मा.जि.प.अध्यक्ष यांच्या समोर ठेवले. जिल्हा परिषद अध्यक्ष मा.श्री.अनिरुद्ध कांबळे यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना म्हटले की तुमचे प्रश्न मार्गी लावले जातील आणि संघटनेच्या पदाधीकाऱ्यांसोबत लवकर बैठक ठेऊन मेडिकल बिलांना क्युरी कशी लागते ते पाहतो असे म्हटले.
सर्व मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तरीय समुह नृत्य स्पर्धेचे बक्षीस वितरण, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय शंकरराव मोहिते पाटील आदर्श शिक्षक, जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय रत्नाई आदर्श शाळा पुरस्कार आणि शिक्षक रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

महाराष्ट राज्याचे लाडके मा. उपमुख्यमंत्री मा.श्री.विजयसिंह मोहिते पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना म्हटले की जयविजय परिवार आणि संस्थापक अध्यक्ष मा.श्री. सुभाषराव मिसाळ यांचे कार्य उल्लेखनीय आहे असे म्हटले. जिल्हा परिषद सदस्या मा.कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देताना म्हटलं की सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील प्राथमिक शाळा उत्कृष्ठ आहेत, शिक्षक मनापासून काम करतात, तसेच जयविजय परिवाराचे कार्य आणि नियोजन नेहमी उत्कृष्ठ असते असे विचार व्यक्त केले.
सदर अधिवेशन पार पाडण्यासाठी माळशिरस तालुका अध्यक्ष मोहन बाबर सर सरचिटणीस संतोष रुपनवर जय विजय पतसंस्थेचे चेअरमन अशोकभाऊ रुपनवर, व्हॉईस चेअरमन हनुमंत लोहार जयविजय शिक्षक संघ जिल्हा कार्यकारिणीतील ज्ञानोबा मस्के, मधुकर यादव, बाळासाहेब साठे, , पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर मगर, संचालक दिपक सर्वगोड, प्रताप काळे, दत्तात्रय गायकवाड, कुंदन जाधव ,दिलीप मुळे, जिवाजी मिसाळ,सोमनाथ मिसाळ, अस्वरे सर, हाके सर, अजित पवळ, विजय मिसाळ, परसेवार सर, उत्तम कुदळे, तुकाराम वाघमोडे, रामचंद्र राजगुरू,अशोक राजगुरू, बशीर मुलाणी, संपत मिसाळ, विठठल काशिद, गणपत जाधव, राजेंद्र लोहार आणि जय विजय परिवार यांनी भरपूर कष्ट घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.तुकाराम वाघमोडे सर, श्री .दत्तात्रय गायकवाड आणि श्री .प्रशांत सरूडकर सर यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार जयविजय पतसंस्थेचे चेअरमन श्री.अशोक रुपनवर सर यांनी मानले.

????????????

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button