अमळनेर मतदारसंघात पाचही गटातील जनता विकासासाठी देणार भाजपाला साथ-बाळासाहेब पाटील
,आ.शिरीष चौधरी मताधिक्याने विजयी होण्याचा व्यक्त केला विश्वास
अमळनेर( )अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पाचही जिल्हा परिषदेच्या गटात विकास हाच मुद्दा जनतेच्या पसंतीस उतरत असल्याने या भूमीच्या विकासासाठी ते भाजपालाच साथ देऊन महायुतीचे उमेदवार आ.शिरीष चौधरीं यांना मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जीवन पाटील यांनी व्यक्त केला आहे.
बाळासाहेब पाटील यांनी शिरीष चौधरी यांच्या प्रचारार्थ ग्रामिण भाग संपुर्ण पिंजून काढला असून पाचही जिल्हापरिषद गटात गावागावात भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधून भाजपा शिवाय आज पर्याय नसल्याने शिरीष चौधरीच योग्य उमेदवार असल्याचे पटवून दिले आहे ,जनतेच्या ऊस्फूर्त प्रतिक्रिया पाहता त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.शिरीष चौधरींच्या विजयाची खात्रीबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की या मतदारसंघात भाजपची उमेदवारी ज्याला मिळाली त्यांचे काम अतिशय प्रामाणिकपणे कार्यकर्त्यानी केले असून मतांची उंची मोठीच राहिली आहे,गेल्या दोन पंचवार्षिक मध्येही मते चांगली असली तरी स्वतः उमेदवारच पराभवास कारणीभूत ठरला आहे.परंतु आता तेच उमेदवार विरोधी पक्षात गेले असून भाजपाने आ.शिरीष चौधरींच्या रूपाने योग्य आणि कार्यक्षम उमेदवार दिला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेला विकास जनतेच्या समोर आहे, पाच वर्षात जलयुक्तच्या माध्यमातून त्यांनी सिंचनाची मोठी कामे केली असून मतदारसंघातील प्रत्येक गावात त्यांचे विकासकाम आहे,सर्वत्र रस्त्यांची कामेही त्यांनी सुरू केली आहेत,यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून ते योग्य आहेत,तसेच भाजपा सरकार म्हणजे विकासाची नांदी आणणारे सरकार असून जनतेच्या वाढत्या विश्वासामुळे तेच सरकार पुन्हा राज्यात स्थापन होणार आहे,तेव्हा शिरीष चौधरींच्या रूपाने आपला प्रतिनिधी सत्तेमध्ये सहभागी करण्याची संधी आपल्याला मिळाली असून या संधीचे सोने केल्यास या मतदारसंघात पुनश्च विकासाची नांदी सुरू होणार आहे,निवडणूकीच्या बाबतीत अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आणि प्रत्येक निवडणूकित अचूक अंदाज व्यक्त करणारे ना.गिरीश महाजन यांनी उत्तरमहाराष्ट्रात 40 जागावर महायुतीचा विजय होईल असे भाकीत वर्तविले असून त्यात अमळनेरची जागा देखील भाजपचीच राहील असे संकेत त्यांनी दिले आहेत.यामुळे आता अमळनेर मतदारसंघात विजय भाजपाचाच होणार असा विश्वास बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला आहे.






