Amalner

अमळनेर  न प येथे सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन,दीपावली निमित्त सर्व अधिकारी,कर्मचारी, सर्वांना मिठाई वाटप

अमळनेर न प येथे सरदार पटेल जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन,दीपावली निमित्त सर्व अधिकारी,कर्मचारी, सर्वांना मिठाई वाटप

अमळनेर येथील नागरपरीषदेत आज सरदार

वल्लभभाई पटेल जयंती ,माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिन प्रित्यर्थ सर्व कर्मचारी,अधिकारी सर्वांना मिठाई चे वाटप करण्यात आले.
यावेळी संजय चौधरी यांनी सांगितले आज पर्यंत अनेक मुख्याधिकारी आलेत परंतु अश्या प्रकारे दीपावली पहिल्यांदा साजरी करण्यात आली कारण मुख्याधिकारी या पूर्वी शिक्षिका होत्या त्यामुळे त्यांना प्रत्येकाचे मनातल्या भावना कळतात तसेच त्यांनी 7 वा वेतन आयोगाच्या शिफारसी नुसार सप्टेंबर महिन्याचे वेतन अदा कण्याचे देखील आदेश दिले आहेत व वेतन अनुदान तील फरकानुसार एक वेतन न प फंडातुन करणेत येईल असे सांगत वसूली विभागाला सक्त सूचना देखील दिल्या आहेत त्यामुळे सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे सर्वांच्या वतीने मुख्याधिकारी, नगराध्यक्ष सौ पुष्पलता ताई पाटील,जिजामाता कृषिभूषण,मा माजी आमदार श्री कृषिभूषण साहेबराव दादा पाटील व सर्व नगरसेवक यांचे आभार मानले.
सदर प्रसंगी उपमुख्याधिकारि संदीप गायकवाड , हर्षल सोनवणे,पा पु अभियंता,प्रशांत ठाकूर विद्युत अभियंता, संतोष बिऱ्हाडे आरोग्य निरीक्षक, युवराज चव्हाण आरोग्य निरीक्षक, अरविंद कदम आरोग्य निरीक्षक ,नेहा पाटील कर निरीक्षक, चंद्रकांत मुसळे प्रकल्प अधिकारी सु ज यो ,सोमचंद संदानशिव ,नितीन खैरनार ,राधा नेतले,अरुणा बार्हे, संगीता माघाडे,कीर्ती गाजरे, गणेश पाटील,प्रसाद पाटील, बोरोले,लटपटे, कमलेश पाटील इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button