Amalner

? Big Breaking…गणेशोत्सव व मोहरम सण साजरे करतांना नियमांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल….

? Big Breaking..गणेशोत्सव व मोहरम सण साजरे करतांना नियमांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल….

पोलीस प्रशासनातर्फे आयोजित बैठक

अमळनेर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी गणेश उत्सव व मोहरम सण कशा रीतीने साजरा करावा यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा व अमळनेर सौरभ अग्रवाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी मार्गदर्शन म्हटले की सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीची मर्यादा ४ फूट तसेच घरगुती गणेशोत्सवाचे मूर्ती मर्यादा २ फूट असावे कलम १४४ लागू असल्याने गर्दी करू नये. सजावट तसेच ध्वनिप्रदूषण होऊ नये. गणेश मंडळांना दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे नियम भंग झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल. विशेष करून शिक्षण घेणाऱ्या १४ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी करून कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. गणेश मूर्तीच्या आगमनाची तसेच विसर्जनाची मिरवणूक काढू नये.

गणेश मंडळांनी खर्चात कपात करून शिल्लक राहिलेला निधी कोविड १९ या साथ आजाराच्या सत्कर्मी लागेल याबाबत विचार करावा असे आवाहन केले.

या आवाहनास मंगलमूर्ती पतपेढी गणेशोत्सव मंडळातर्फे कोविड केअर सेंटर मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा एक दिवसाचा जेवणाचा खर्च करण्याचे मंडळाचे अध्यक्ष बापु वाणी यांनी केले.कंटेन्मेंट झोन मधील गणेश मंडळांनी गणपती बसवू नये अशी सूचना उपविभागीय अधिकारी सौरभ अग्रवाल यांनी यावेळी केली

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पो ना शरद पाटील यांनी केले. यावेळी विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, पो कॉ ढोबळे, पो कॉ लबडे,पो कॉ दिपक माळी,पो कॉ रवी पाटील,पत्रकार बंधू आणि भगिनी इ उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button