Akkalkot

जेष्ठकालीन वयात स्वामी दरबारातील सन्मान हे जीवनाचे परमभाग्य  – पुरुषोत्तम गज्जम

जेष्ठकालीन वयात स्वामी दरबारातील सन्मान हे जीवनाचे परमभाग्य – पुरुषोत्तम गज्जम

कृष्णा यादव, प्रतिनिधी अक्कलकोट : –

मानवी जीवन जगत असताना माणसाने आयुषभर केलेल्या सत्कर्माचे फळ हे जेष्ठ वयात लाभत असते. इतर स्वामी भक्तांप्रमाणे आपणही श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असून आयुष्यभर स्वामीभक्ती व समर्थसेवेमुळे आपणास धार्मिक व सामाजिक कार्य करण्यास नेहमीच प्रेरणा मिळाली. या प्रेरणेतून अनेक समाजोपयोगी कार्य आपल्या हातून घडल्याचे आनंद आपणास नेहमीच लाभत राहील. आयुष्यात आपण केलेल्या स्वामी भक्तीमुळे स्वामींचा प्रसाद म्हणून जेष्ठकालीन वयात आज येथील स्वामी दरबारातील सन्मान म्हणजे माझ्या जीवनाचे परमभाग्य असल्याचे मनोगत सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन व जेष्ठ समाजसेवक पुरुषोत्तम गज्जम यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्नीक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त विलासराव फुटाणे, महेश गोगी, संपतराव शिंदे, समाधान होटकर, श्रीशैल गवंडी, संजय पवार, अविनाश क्षीरसागर, स्वामीनाथ लोणारी, वैभव जाधव, जयसिंह इंगळे, महादेव तेली, सागर गोंडाळ, प्रसाद सोनार, चंद्रकांत गवंडी, विजयकुमार कडगंची, रवीराव महिंद्रकर, संतोष जमगे, आदींसह अनेक स्वामी भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात पुरुषोत्तम गज्जम यांचा सपत्नीक सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button