अमळनेर कोव्हीड केअर सेंटर मध्ये सुविधा नसल्याने कोरोन्टाईन रुग्णांचे बंड….
अमळनेर येथे वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्ये मुळे कोव्हीड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटर च्या बाबतीत अनेक तक्रारी या आधी ही प्राप्त झाल्या आहेत. येथून यापुरेई ही रुग्णांनी सुविधे अफ़ावी पलायन करण्याचा प्रयत्न केला होता.
आता कोविड सेंटरमधील अपूर्ण सुविधा आणि स्वब घेऊनही अहवाल येत नसल्याने संतप्त
संशयित रुग्णांनी बंड केले आहे आणि प्रशासनाला आम्ही घरी निघून जाऊ असा
इशारा दिलाआहे . यामुळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.काल हा प्रकार कोव्हीड केअर सेंटर मध्ये घडला…प्रशासकीय अधिकारी यांना माहिती मिळताच ते जागेवर पोहचले आणि रुग्णांची समजूत काढली.सध्या तरी हा प्रकार थांबला असून रुग्ण शांत झाले आहेत.
येथे पाण्याचा त्रास होतोय ,काही खोल्यांमध्ये लाईट नाहीत , प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक पिशव्यांमध्ये जेवण दिले जाते, कमी रुग्ण असतील तर जेवणाची क्वालिटी चांगली असते आणि जास्त रुग्ण झाले तर जेवण अत्यन्त खराब दिले जाते अश्या अनेक तक्रारी येथे असलेलया संशयित रुग्णांनी केल्या आहेत.
गेल्या काही दिवसात 150 लोकांचे स्वब तपासणी साठी गेले आहेत त्यांचे अहवाल अजून प्राप्त झाले नाहीत यामुळे येथील संशयित रुग्ण चिडले आहेत.
परन्तु यामुळे पुन्हा प्रशासकीय यंत्रणा आणि कोव्हीड केअर सेंटर च्या सुविधांसंदर्भात प्रश चिन्ह निर्माण झाले आहे.
येत्या काही दिवसांत जर येथील परिस्थिती सुधारली नाही तर निश्चितच येथील रुग्ण पुन्हा बंड करतील अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.






