?️ Big Breaking… अमळनेर येथे 19 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह…एक मयत रुग्णांची संख्या एकूण 46
जिल्ह्यातील स्वॅब घेतलेल्या 84 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 65 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून एकोणीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये भुसावळ येथील एका व्यक्तीचा तर अमळनेर येथील 19 व्यक्तींचा समावेश आहे.तर मयत झालेल्या संख्यते एकाची भर पडली आहे. त्यामुळे अमळनेर येथील मृत्यू संख्या एकूण 7 झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 85 इतकी झाली अमळनेरची संख्या आता 46 वर पोहचली आहे. जिल्ह्यातील त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ नागोराव चव्हाण यांनी दिली.






