Amalner

?️ Big Breaking..अखेर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती चा कोरोना बॉम्ब फुटला…खेडो पाडी घुसला कोरोना…

?️ Big Breaking..अखेर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती चा कोरोना बॉम्ब फुटला…खेडो पाडी घुसला कोरोना…

प्रा जयश्री दाभाडे

अमळनेर गेल्या 4 दिवसांत कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या 22 एप्रिल पासून अमळनेर तालुक्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन सुरू आहे.परंतु काही ठराविक काळ वगळता अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सातत्याने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा आणि त्यांचे नुकसान होऊ नये असा भास निर्माण करत स्वतःची झोळी भरून घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू ठेवण्यात आली.

या ठिकाणी लिलाव प्रक्रिया करतांना कोणत्याही प्रकारचे नियम पाळले जात नाही असे वारंवार निदर्शनास आले आहे.सोशल डिस्टन्गसिंग नाही,सॅनिटायझर चा उपयोग केला जात नाही,एका ट्रॅकटर, गाडीवर अनेक लोक एकत्रीत लिलावास येतात,मास्क लावले जात नाहीत त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरक्षित असलेल्या ग्रामीण भागात आता कोरोनाने मार्केट च्या माध्यमातून जोरदार प्रवेश केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराशी संबंधित चार रुग्ण शहरी भागातील आढळून आले आहेत. यातील एका घरातील 3 व्यक्ती असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर एका पॉझिटिव्ह व्यक्तीची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हॉटेल आहे.आता या चार व्यक्तींच्या संपर्कातील सर्व व्यक्तींचा शोध घेणे आवश्यक आहे. याच दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाने प्रवेश केला आहे हे सर्व ग्रामीण भागातील रुग्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संपर्कातील असण्याची दाट शक्यता आहे. कारण ज्या पद्धतीने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव प्रक्रिया पार पाडली जाते ती पाहून येथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

आता याकडे प्रशासन कसे लक्ष देते आणि काय कार्यवाही करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण सर्वात जास्त प्रमाणात लोक या ठिकाणी येतात.गर्दी करतात,मोठ्या संख्येने लिलाव प्रक्रियेत भाग घेतात नियमांचे उल्लंघन करतात..सामान्य माणसाच्या हात मजूर लोकांच्या गाड्या उलट्या करणारे,मोज माप करण्याचे काटे फेकणारे जप्त करणारे प्रशासन कृषी उत्पन्न बाजार समिती चे काय सामान जप्त करते आणि कायदेशीर कारवाई केली जाते हे पाहणे आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया जनतेतून येत आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button