?️ Big Breaking.. कोरोना अपडेट..अमळनेर येथील आज 9 रुग्ण कोरोना मुक्त….
आधीचा 1 असे एकूण 10 रुग्ण कोरोना मुक्त
अमळनेर
जळगाव जिल्ह्यातील आणखी 21 रुग्णांना कोरोना मुक्त करून आज सायंकाळी आपापल्या घरी पाठविण्यात आले आहे. या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आला. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीमध्ये अमळनेर येथील 9 यापूर्वी अमळनेर येथील 1 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. यातील 7 हाय रिस्क मधील रुग्ण हे जळगांव येथून तर 2 रुग्ण अमळनेर कोव्हीड सेंटर येथून घरी परतले आहेत.हे रुग्ण साळी वाडा,अमलेश्वर नगर या भागातील आहेत.
आता कोव्हीड केअर सेंटर मध्ये एकूण 63 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून 41 रुग्ण संशयित आहेत. आज 41 रुग्णांचे स्वॕब तपासणी साठी रवाना करण्यात आले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.ताडे यांनी दिली आहे.
असे एकूण 10 रुग्ण बरे झाले आहेत. ही निश्चितच आशादायक बाब असून यामुळे डॉ,पारिचारिका,रुग्ण यांचा आत्मविश्वास वाढणार असून लोकांच्या मनातील भीती कमी होणार आहे.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या व्यक्तींना होम क्वांरटाईन ठेवण्यात येणार असल्याचेही डॉ ताडे यांनी सांगितले आहे.






